Aadhaar-PAN linking update: तुम्ही जर करदाते असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही अद्याप तुमचे पॅन आधारशी लिंक केले नसेल, तर तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. आयकर विभागाने ३१ मेपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. आयकर विभागाने आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हॅण्डलवर ट्वीट करीत करदात्यांना याबाबत इशारा दिला आहे.

आयकर नियमांनुसार, जर करदात्याचे पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल, तर अशा परिस्थितीत त्यांना दुप्पट टीडीएस भरावा लागेल. आयकर विभागाने एक्सवर नमूद केले की, ३१ मे २०२४ रोजीपूर्वी पॅन कार्ड, आधार कार्डशी लिंक केल्याने हे निश्चित होईल की, ३१ मार्च २०२४ पूर्वी करण्यात आलेल्या व्यवहारासाठी निष्क्रिय पॅनमुळे तुम्हाला आयकर अधिनियम, १९६१ च्या कलम २०६एए आणि २०६ सीसी अंतर्गत उत्पन्नावर उच्च कपातीचा सामना करावा लागणार नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने म्हटले आहे की, ज्या खात्यांमध्ये ३१ मार्च २०२४ पर्यंत व्यवहार झाले आहेत, त्या खात्यांमधून ३१ मे २०२४ पर्यंत आधार आणि पॅन लिंक केल्यावर जास्त दराने TDS कापला जाणार नाही.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Navjot Singh Sidhu
“अर्चना पूरन सिंगच्या जागी मी पुन्हा यावं…” नवज्योत सिंग सिद्धूंचे वक्तव्य; कपिल शर्मा शोमध्ये परतणार का?
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती? जन्मराशीनुसार तुम्हाला पावणार आज भगवान विष्णू व देवी लक्ष्मी; वाचा राशिभविष्य
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

(हे ही वाचा : Gold-Silver Price: बुधवारी सकाळी सोन्या-चांदीचे भाव उलटले अन् बाजारात उडाली खळबळ; पाहा १० ग्रॅमची किंमत)

पॅन व आधार लिंक न केल्यास काय होईल?

प्राप्तिकर विभागाने पॅनधारकांना ताकीद दिली आहे की, ३१ मे २०२४ पर्यंत कोणताही करदाता पॅन आणि आधार लिंक करण्यात अयशस्वी झाला, तर अशा परिस्थितीत करदात्यांना त्या पॅन कार्डवर अतिरिक्त दराने TDS भरावा लागेल. म्हणून शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करा.

पॅन व आधार लिंक कसे करावे?

  • सर्वांत आधी तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या.
  • पुढे, ‘Quick Links’ विभागात क्लिक करा आणि ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढे येथे पॅन आणि आधार क्रमांक टाका आणि ‘Validate’ पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे नाव व आधार कार्ड यांचा मोबाईल नंबर टाका आणि आधार लिंक या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल नंबर व त्यावर मिळालेला OTP येथे एंटर करा आणि नंतर ‘Validate’ बटणावर क्लिक करा.

पॅन कार्ड आधारकार्डशी लिंक झाले की नाही कसे तपासाल?

एसएमएसच्या माध्यमातून पॅन-आधार कार्ड लिकिंग स्टेट्स तपासण्याचा पर्याय आयकर विभागाने दिला आहे. यासाठी तुम्हाला ५६७६७८ अथवा ५६१६१ या क्रमांकावर एसएमएस पाठवावे लागेल. जर दोन्ही कार्ड जोडली गेली असतील तर त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळू शकते.

या सोप्या स्टेप्सद्वारे तुम्ही पॅनला आधारशी लिंक करू शकता.