२०२२-२३ या वर्षात देशात कोळशाचे आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन झाले. २०२१-२२ या वर्षात ७७८.२१ दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले होते. २०२२-२३ या वर्षात ते उत्पादन १४.७७ टक्क्यांच्या वाढीसह ८९३.१९ दशलक्ष टन (तात्पुरते) इतके नोंदले गेले. आधीच्या वर्षीच्या तुलनेत २०२२-२३ या वर्षात महाराष्ट्रासह आसाम, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमध्ये कोळसा उत्पादनात वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर २०२२-२३ या वर्षात जम्मू काश्मीरमध्ये याच कालावधीत कोळसा उत्पादन घसरले आहे. देशांतर्गत उत्पादन/ पुरवठा याद्वारे कोळशाला असलेली देशातील गरज, मागणी पूर्ण केली जाते. देशातील कोळसा उत्पादन वाढवणे आणि कोळशाची आयात कमी करणे यावर सरकारचा भर आहे. केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

हेही वाचाः विश्लेषणः आगामी काळात भाजीपाल्यांचे दर आणखी कडाडणार, नेमकी कारणं काय?

तर गेल्या काही दिवसांपूर्वीच भारताच्या कोळसा क्षेत्राने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत ८.५ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवत एकूण २२३.३६ दशलक्ष टन इतके कोळसा उत्पादन करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला होता. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये याच कालावधीत २०५.७६ दशलक्ष टन उत्पादन झाले होते.

हेही वाचाः जेट एअरवेज पुन्हा उड्डाण करणार, DGCA ने एअरलाइन कंपनीला दिली मंजुरी

कोल इंडिया लिमिटेडने एप्रिल ते जून २०२३ दरम्यान १७५.४८ दशलक्ष टन उत्पादन नोंदवले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील १५९.७५ दशलक्ष टनाच्या तुलनेत ९.८५ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ दर्शवली होती. एप्रिल २०२३ ते मे २०२३ या कालावधीत कोळशाच्या आयातीत १६.७६ टक्क्यांनी वाढ झाली होती, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ प्रामुख्याने कोळशाच्या आयात किमतीतील लक्षणीय घसरणीला कारणीभूत आहे हे इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in coal production in nine states including maharashtra in 2022 23 vrd