भारताच्या कोळसा क्षेत्राने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत ८.५ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवत एकूण २२३.३६ दशलक्ष टन इतके कोळसा उत्पादन करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये याच कालावधीत २०५.७६ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. कोल इंडिया लिमिटेडने एप्रिल ते जून २०२३ दरम्यान १७५.४८ दशलक्ष टन उत्पादन नोंदवले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील १५९.७५ दशलक्ष टनाच्या तुलनेत ९.८५ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ दर्शवते.
एप्रिल २०२३ ते मे २०२३ या कालावधीत कोळशाच्या आयातीत १६.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ प्रामुख्याने कोळशाच्या आयात किमतीतील लक्षणीय घसरणीला कारणीभूत आहे हे इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचाः फ्रान्स आणि सिंगापूरनंतर आता श्रीलंकेतही UPI चालणार
कोळशाच्या उपलब्धतेबाबत देशात पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध आहे. जून २३ अखेरीस हा साठा १०७.१५ दशलक्ष टन इतका आहे, यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३७.६२ टक्क्यांची वाढ दिसून येते. कोळशाच्या साठ्याची भरीव उपलब्धता असल्यास कोळशावर अवलंबून असलेल्या विविध क्षेत्रांना स्थिर पुरवठा करता येतो. ज्यामुळे देशाच्या एकूण ऊर्जा सुरक्षेला मोठा हातभार लावता येतो.
हेही वाचाः सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला; घसरणीमागील प्रमुख कारण काय?
कोळसा उत्पादनात भारताची ही उपलब्धी कोळसा उद्योगाच्या एकत्रित प्रयत्नांचे आणि देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठीची कोळसा उद्योगाची वचनबद्धता दर्शवते.