देशातील दोन सरकारी आणि एका खासगी बँकेने कर्जाच्या व्याजदरात बदल केले आहेत. पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि ICICI बँक अशी त्यांची नावे आहेत. बँकांनी जवळपास सर्व मुदतीच्या कर्जासाठी MCLR दर बदलला आहे. नवीन कर्जाचे दर १ ऑगस्ट २०२३ पासून लागू होणार आहे. त्याचा तुमच्या ईएमआयवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. खरं तर बँकेचा MCLR दर हा किमान व्याजदर असतो, त्यामुळे त्याच्या खाली बँक कर्ज देत नाही. अशा परिस्थितीत बँकेने MCLR वाढवल्यास किंवा त्यात काही बदल केल्यास त्याचा थेट परिणाम कर्जदारांवर होतो. आता आपण कोणत्या बँकेने किती MCLR दर वाढवला आहे हे जाणून घेणार आहोत.
आयसीआयसीआय बँक
ICICI बँकेने सर्व मुदत कर्जावरील व्याजदरात ०.०५ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामध्ये एक दिवस, एक महिना ते एक वर्ष आणि त्याहून अधिक कालावधीच्या कर्जांचा समावेश आहे. आतापासून ओव्हरनाइट आणि एक महिन्याच्या कर्जासाठी MCLR दर ८.४० टक्के असेल. तीन महिन्यांसाठी ८.४५ टक्के, सहा महिन्यांसाठी ८.८० टक्के आणि एका वर्षासाठी ८.९० टक्के दराने व्याज आकारले जाणार आहे.
हेही वाचाः GST Collection : जुलैमध्ये बंपर जीएसटी संकलन, आकडा १.६५ लाख कोटींच्या पार
पंजाब नॅशनल बँक
सध्या पंजाब नॅशनल बँकेने MCLR मध्ये कोणताही बदल केलेला नाही. हे ओव्हरनाइटसाठी ८.१० टक्के, एका महिन्यासाठी ८.२० टक्के, तीन महिन्यांसाठी ८.३० टक्के, सहा महिन्यांसाठी ८.५० टक्के, एका वर्षासाठी ८.६० टक्के आणि तीन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी ८.९० टक्के आहेत.
हेही वाचाः जन धन खात्यातील एकूण ठेवी २ लाख कोटींच्या पुढे; सरकारची लोकसभेत माहिती
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियाने त्यांच्या काही कर्जांसाठी MCLR वाढवला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, वेगवेगळ्या कालावधीसाठी MCLR दर खालीलप्रमाणे आहे.
ओव्हरनाइट ७.९५ टक्के,
एक महिना ८.१५ टक्के,
३ महिने ८.३० टक्के,
६ महिने ८.५० टक्के,
एक वर्ष ८.७० टक्के,
तीन वर्षे आणि त्याहून अधिक कालावधीसाठी ८.९० टक्के व्याजदर आकारला जाणार आहे.