रॉयटर्स, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अडचणीत आलेल्या अदानी समूहाने जपान आणि युरोपमधील आघाडीच्या बँकांचा आमच्यावर विश्वास कायम आहे, असा दावा केला आहे. गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी अदानी समूहाने हे पाऊल उचलले आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर भांडवली बाजारात अदानी समूहातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांना मोठा फटका बसला. या कंपन्यांच्या बाजारमूल्यात २४ जानेवारीपासून सुमारे १२० अब्ज डॉलरची घट झाली आहे. कंपन्यांच्या समभागांचे भाव फुगवणे आणि कर चुकवण्यासाठी परदेशात गैरमार्गाने पैसा पाठवणे, असे आरोप हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात करण्यात आले आहेत. अदानी समूहाकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> ‘सेबी’कडून तीन कंपन्यांच्या आयपीओला मंजुरी
आता अदानी समूहाने गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी काही दस्तावेज तयार केले आहेत. मित्सुबिशी एफजी फायनान्शियल ग्रुप (एमयूएफजी), सुमिटोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप एसएमबीसी युनिट, मिझुहो फायनान्शियल ग्रुप, स्टँडर्ड चार्टर्ड, डॉईश बँक या जपान आणि युरोपमधील बँकांनी अदानी समूहावर विश्वास दाखवल्याचा दावा या दस्तावेजामध्ये करण्यात आला आहे. परंतु, या बँकांनी नेमका कशाप्रकारे अदानी समूहावर पुन्हा विश्वास दाखवला याचा तपशील कागदपत्रांमध्ये देण्यात आलेला नाही.
हाँगकाँगपासून न्यूयॉर्कपर्यंत ‘रोड शो’
अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग मागील महिन्यात काही प्रमाणात सावरले आहेत. समूहाने काही कर्जाची मुदतपूर्व परतफेड केली असून, जीक्यूजी पार्टनर्स कंपनीने समूहात १.९ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा प्राप्त करण्यासाठी अदानी समूहाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यात हाँगकाँगपासून न्यूयॉर्कपर्यंत अनेक ठिकाणी ‘रोड शो’ आयोजित करण्यात आले होते.