भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी त्यांची कंपनी आणि आयआयटी बॉम्बे भारताला जीपीटी बनवण्यासाठी एकत्र काम करत असल्याची माहिती दिली. याशिवाय जिओ टीव्हीसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टीमवरही काम करीत आहे. मुंबईत आयोजित आयआयटी बॉम्बेच्या वार्षिक टेकफेस्टमध्ये आकाश अंबानी यांनी या गोष्टी सांगितल्या.
आगामी काळात जिओ देशासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी काम करत आहे आणि मीडिया, कम्युनिकेशन आणि नवीन उपकरणांवरही काम करीत असल्याचीही त्यांनी माहिती दिली. आकाश अंबानी म्हणाले की, आगामी काळात भारत जगातील एक प्रमुख ‘इनोव्हेशन सेंटर’ म्हणून उदयास येऊ शकतो. येत्या काही वर्षांत भारत जगाला सर्वोत्तम सेवा आणि सर्वोत्तम उत्पादने पुरवण्याचे केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो, असंही त्यांनी अधोरेखित केलं.
हेही वाचाः UPI Changes : नव्या वर्षात UPI मध्ये होणार ९ महत्त्वाचे बदल, सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
हेही वाचाः Ratan Tata Birthday : …ज्यांनी टाटाला बनवले विश्वासाचा ब्रँड
जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की, भारत येत्या दशकात ५ ते ६ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०२४ हे वर्ष त्यांच्या कुटुंबासाठी खास असेल, कारण येत्या वर्षात त्यांचा लहान भाऊ अनंतचे लग्न होणार आहे.