नवी दिल्ली : सरलेल्या मे महिन्यात देशाची व्यापारी मालाची निर्यात ९ टक्क्यांनी वधारून ३८.१३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात ३४.९५ अब्ज डॉलर होती, अशी शुक्रवारी वाणिज्य मंत्रालयाने माहिती दिली. यंदा अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, औषधी, कापड आणि प्लास्टिक यांसारख्या क्षेत्रातील सुदृढ वाढीमुळे जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही निर्यातीत वाढ होण्यास मदत झाली. मात्र खनिज तेलाच्या आयातीतील वाढीमुळे एकूण आयातदेखील ७.७ टक्क्यांनी वधारून ६१.६१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ती ५७.४८ अब्ज डॉलर होती.

हेही वाचा >>> घाऊक महागाई दर १५ महिन्यांच्या उच्चांकी; मे महिन्यात २.६१ टक्क्यांवर; किरकोळ महागाईच्या विपरीत वाट

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मे महिन्यात तेलाची आयात २८ टक्क्यांनी वाढून २० अब्ज डॉलर झाली आहे. २०२४-२५ एप्रिल-मे दरम्यान ती एकत्रित २४.४ टक्क्यांनी वाढून ३६.४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या वर्षीच्या मे महिन्यात सोन्याची आयात किरकोळ घसरून ३.३३ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली. जी गेल्या वर्षी याच महिन्यात ३.६९ अब्ज डॉलर होती.

देशाच्या आयात-निर्यातीतील तफावत अर्थात व्यापार तुटीने २३.७८ अब्ज डॉलरची पातळी गाठल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीने स्पष्ट केले. विद्यमान आर्थिक वर्षातील (२०२४-२५) एप्रिल-मे या दोन महिन्यांच्या कालावधीत निर्यात ५.१ टक्क्यांनी वाढून ७३.१२ अब्ज डॉलर झाली आणि त्या तुलनेत आयात ८.८९ टक्क्यांनी वाढून ११६ अब्ज डॉलर झाली आहे. मात्र सरलेला मे महिना हा निर्यातीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरला आहे आणि हा कल पुढेही कायम राहील, अशी आशा वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी व्यक्त केली.

Story img Loader