नवी दिल्ली : भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात ५.९ टक्के राहील, असा अंदाज नोमुराने शुक्रवारी वर्तविला. नोमुराने आधीच्या ५.५ टक्के विकासदराच्या अंदाजात आता वाढ केली आहे. भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) दर एप्रिल ते जून तिमाहीत ७.८ टक्के नोंदविण्यात आला. जानेवारी ते मार्च तिमाहीत तो ६.१ टक्के होता.
हेही वाचा >>>विकासदर ६.७ टक्क्यांवर जाईल! ‘मूडीज’कडून चालू वर्षाबाबत सुधारित अंदाज
जूनअखेर संपलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग अधिक राहिल्याने नोमुराने चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी विकासदराचा अंदाज ५.५ टक्क्यांवरून ५.९ टक्क्यांवर नेला आहे. याच वेळी पुढील आर्थिक वर्षासाठीचा विकासदराचा अंदाज नोमुराने ६.५ टक्क्यांवरून घटवून ५.६ टक्क्यांवर आणला आहे. जागतिक पातळीवरील मंदीचे वारे यामुळे हा अंदाज घटविण्यात आला आहे.