भारताच्या निर्यात आणि आयातीशी संबंधित एक वाईट बातमी समोर येत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत २.६ टक्क्यांनी घट झाली आहे. आकडेवारीनुसार, निर्यात २.६ टक्क्यांनी घसरून ३४.४७ अब्ज डॉलर झाली आहे, जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत ३५.३९ अब्ज डॉलर होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः Forbes Richest Indian Women : सावित्री जिंदाल बनल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला, पाहा टॉप १० यादी

आयातीतही घट झाली

सप्टेंबरमध्ये आयातही कमी झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात आयात १५ टक्क्यांनी घसरून ५३.८४ अब्ज डॉलर झाली आहे, जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत ६३.३७ अब्ज डॉलर होती. व्यापार तुटीबद्दल बोलायचे झाल्यास सप्टेंबरमध्ये व्यापार तूट १९.३७ अब्ज डॉलर होती.

हेही वाचाः World Egg Day 2023 : भारतातील अंड्यांचे अर्थकारण माहीत आहे का? जाणून घ्या

आर्थिक वर्ष २३-२०२४ मध्ये आतापर्यंत निर्यात आणि आयात किती झाली?

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत निर्यात ८.७७ टक्क्यांनी घसरून २११.४ अब्ज डॉलर झाली आहे. तर याच कालावधीत आयात १२.२३ टक्क्यांनी घसरून ३२६.९८ अब्ज डॉलर झाली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India imports and exports fell with trade deficit at 19 37 billion in september vrd
Show comments