वाइन प्रेमींसाठी वाइनची चव खूप महत्त्वाची असते. दारूच्या चवीतील फरक तुम्हाला कदाचित पटकन सांगता येणार नाही, पण वाइन प्रेमी तुम्हाला चवीतील फरक लगेचच सांगतील. दरम्यान, आता व्हिस्कीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात बनवलेल्या दारूने जगातील सर्व व्हिस्कीला मागे टाकले आहे आणि ती नंबर १ व्हिस्की बनली आहे. भारतात बनवलेल्या Indri Diwali Collector Edition 2023 ला जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला आहे. अमेरिकन सिंगल माल्ट, स्कॉच व्हिस्की, बोर्बन्स, कॅनेडियन व्हिस्की, ऑस्ट्रेलियन सिंगल माल्ट आणि ब्रिटिश सिंगल माल्ट यासह १०० वेगवेगळ्या व्हिस्कींची चव चाखल्यानंतर इंद्रीला सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले गेले आहे. दारू ही वाईट गोष्ट असू शकते, पण हा नंबर १ खिताब जिंकणे ही भारतीयांसाठी मोठी गोष्ट आहे. त्या वाईनची किंमत किती आहे ते जाणून घेऊ यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः Money Mantra: सणासुदीच्या काळात सोने विकत घेताय? मग हे नक्की वाचा

किंमत किती आहे?

भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारू वेगवेगळ्या किमतीला विकली जाते. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये इंद्री सिंगल माल्ट इंडियन व्हिस्की विकत घेतल्यास तुम्हाला ती सुमारे ३१०० रुपयांना मिळेल. तर महाराष्ट्रात खरेदी केल्यास ५१०० रुपयांच्या आसपास मिळेल. सध्या ही दारू भारतातील १९ राज्ये आणि जगातील १७ देशांमध्ये उपलब्ध आहे. या व्हिस्कीचे वैशिष्ट्य म्हणजे ही व्हिस्की लाँच होऊन केवळ दोन वर्षे झाली आहेत. दरम्यान, १४ हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. पिकाडिली डिस्टिलरीज नावाच्या कंपनीने २०२१ मध्ये पहिल्यांदा हरियाणामध्ये ही लॉन्च केली.

हेही वाचाः Money Mantra : बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या रोख रकमेवर किती फायदा मिळतो? RBI चे नियम काय? जाणून घ्या

शेअर्स ४२ टक्क्यांनी वाढले

मद्य उत्पादक कंपनी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीजचे शेअर्स बुधवार ४ ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी २० टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर पोहोचले. बेस्ट व्हिस्की अवॉर्ड मिळाल्यानंतर अवघ्या २ दिवसातच कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत त्याचे शेअर्स सुमारे ४२ टक्क्यांनी वाढले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India indri diwali collectors edition 2023 alcohol ranks first in the world what is the price vrd