पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताने २०१४ सालातील जगातील १० व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवरून आता पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान कमावले, त्यामागे अभूतपूर्व पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरीनेच, वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीसारख्या महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांची धरलेली कास कारणीभूत ठरली असल्याचे मत बर्नस्टाइन या आघाडीच्या दलाली पेढीने मोदी सरकारच्या कार्यकाळावरील सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

आणखी वाचा-‘झी’कडून पुनित गोएंका यांच्या जागी कारभार चालवण्यासाठी अंतरिम समितीची स्थापना

‘द डिकेड अंडर पीएम मोदी – ए डीप-डाइव्ह’ या शीर्षकाच्या ३१ पानांच्या अहवालात, महागाई नियंत्रण आणि आर्थिक समावेशकतेचे उपाय आणि डिजिटायझेशन अशा महत्त्वपूर्ण सुधारणांचा गौरवपूर्ण उल्लेख आला आहे. गरिबी निर्मूलन आणि लोकांचा उत्पन्न स्तर वाढवण्यासही या सुधारणांनी योगदान दिले असल्याचे नमूद करताना, २०१४ मध्ये दरडोई उत्पन्नाबाबत जगात १४७ व्या स्थानावरून भारताने आता १२७ व्या स्थानावर मजल मारली आहे, असे अहवालाने नमूद केले आहे.