भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सल्ला दिला आहे. मोठ्या संख्येने नोकऱ्या निर्माण करण्यासाठी भारताला ८ टक्क्यांहून अधिक आर्थिक विकास दराची आवश्यकता आहे, असं रघुराम राजन म्हणालेत. बीजिंगमध्ये एका कार्यक्रमाला त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. भारताची सध्याची आर्थिक वाढ ६ ते ६.५ टक्क्यांनी इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे, परंतु आमच्या रोजगारांच्या गरजेच्या तुलनेत मला वाटते की, हे अजूनही काहीसे कमी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या आणि येथील रोजगाराची गरज लक्षात घेता ८ ते ८.५ टक्के आर्थिक वाढीची गरज आहे. जर आपणाला येथे रोजगाराच्या गरजेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास ही वाढ देखील थोडी मंद दिसते, कारण आपल्याकडे मोठ्या संख्येने तरुण आहेत, ज्यांना रोजगाराची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा