India Pakistan economy comparison : भारत आणि पाकिस्तान २०२३ मध्ये तिसऱ्यांदा क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने आले असता, भारताने पाकिस्तानविरुद्धची अपराजित मालिका ८-० अशी कायम राखली. या विजयाबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला. खरं तर बऱ्याच वर्षांनी असं घडलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वेळेपेक्षा आजचा सामना महत्त्वाचा ठरला. गुजरातमधील अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना झाला आहे. सामना सोडून गुजरातच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले तर जगालाही आश्चर्य वाटेल. एक देश असूनही पाकिस्तानला गुजरातची अर्थव्यवस्था पाहून लाज वाटू शकते. होय, असे म्हणण्याचे कारण म्हणजे गुजरात आणि पाकिस्तानचा जीडीपी जवळपास समान आहे. दोघांच्या जीडीपीमध्ये विशेषत: डॉलरमध्ये विशेष फरक नाही. जर आपणाला आर्थिक विकासाबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तान या बाबतीत गुजरातच्या मागे आहे. गुजरातचा जीडीपी काय आहे आणि आर्थिक वाढ कशी आहे हेसुद्धा जाणून घेऊ यात.
पाकिस्तानचा जीडीपी आणि आर्थिक वाढ
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)च्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तानचा जीडीपी भारत, चीन आणि आशियातील इतर देशांपेक्षा खूपच कमी आहे. आकडेवारीनुसार, सध्या गरीब पाकिस्तानचा जीडीपी ३४०.६४ अब्ज डॉलर आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पाकिस्तान हा जगातील ४६ व्या क्रमांकाचा देश आहे. ज्यांची लोकसंख्या २४ कोटींहून अधिक आहे. विशेष म्हणजे देशाचा आर्थिक विकास भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची आर्थिक वाढ ३.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात ही वाढ ०.५ टक्के होती. त्याआधी पाकिस्तानचा आर्थिक विकास दर ६ टक्के होता.
गुजरातचा जीडीपी आणि आर्थिक वाढ
जर आपणाला गुजरातच्या जीडीपीबद्दल बोलायचे झाल्यास चालू आर्थिक वर्षात तो ३२१ अब्ज डॉलर्सचा जवळपास आहे. जो पाकिस्तानपेक्षा किरकोळ कमी आहे. विशेष म्हणजे गुजरात हे सध्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. चालू आर्थिक वर्षात गुजरातची आर्थिक वाढ १३ टक्क्यांहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. गुजरातची अर्थव्यवस्था आणि तिची वाढ पाहून पाकिस्तानलाही लाज वाटेल हे आता तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही.
SBI ने काय अंदाज वर्तवला?
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक SBI च्या Ecowrap अहवालात, गुजरातच्या आर्थिक वाढीचा आणि GDP चा अंदाज वर्तवण्यात आला होता. SBI च्या Ecowrap अहवालात असे म्हटले आहे की, २०२८ च्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन रुपयांची होईल, तेव्हा त्यात गुजरातचा वाटा ३८६ अब्ज डॉलर असेल. अहवालानुसार, देशाच्या एकूण जीडीपीमध्ये गुजरातचे योगदान ७ टक्क्यांहून अधिक असेल. तसेच गुजरातचा जीडीपी कोलंबियाच्या जीडीपीच्या बरोबरीचा होईल. इकोरॅपच्या अहवालानुसार कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र गुजरातच्या पुढे असतील.