केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी १२ देशांना प्राधान्य देण्याचे निश्चित केले आहे. यात अमेरिका आणि ब्रिटनचा समावेश असून, या देशांमध्ये व्यापार वृद्धीसाठी मंत्रालयाने सविस्तर आराखडा तयार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणिज्य विभाग, उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारताचे परदेशी दूतावास आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या एकत्रित कृती गटाने याबाबत आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार १२ प्राधान्य देशांमध्ये वर्षभरात करावयाचे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. या देशांमध्ये ब्राझील, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन, जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि रशिया यांचा समावेश आहे. आयात आणि निर्यातीचे सखोल विश्लेषण करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. भारताची २० देशांसोबत होणारी गुंतवणूक आणि सामरिक भागीदारी याचाही यात विचार करण्यात आला आहे. यातून वाणिज्य मंत्रालयाने १२ देशांची निवड केली आहे.

हेही वाचाः Money Mantra : पोस्ट ऑफिस आरडीवर आता मिळणार अधिक व्याज; २०००, ३०००, ४००० आणि ५००० रुपयांच्या आरडीवर किती फायदा?

निर्यात आणि गुंतवणुकीवर भर

प्राधान्य देण्यात आलेल्या १२ देशांमध्ये गुंतवणूक आणि व्यापार प्रोत्साहनासाठी ‘रोड शो’चे आयोजन केले जाणार आहेत. याचबरोबर उद्योग आणि निर्यातदारांना जागतिक पातळीवरील प्रदर्शनाचे आयोजन भारतात करण्यासाठी आणि या १२ देशांमध्ये व्यापार मेळावे आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचाः RBI ने स्मॉल फायनान्स बँक उघडण्यासाठी आलेले ३ अर्ज केले रद्द; पण कारण काय?

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India prioritizes 12 countries for trade a detailed plan has been prepared by the union ministry of commerce and industry vrd