वॉशिंग्टन : भारताने बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधामुळे जागतिक महागाईवर परिणाम होईल, असा धोक्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) दिला असून, भारताने या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही या जागतिक संस्थेने बुधवारी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> सीमेवर तणाव असतानाही चिनी गुंतवणुकीस भारताची दारे खुली
भारताने बिगरबासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर २० जुलैला बंदी घातली. देशांतर्गत पुरवठा बाधित होऊ नये आणि सणासुदीच्या काळात भाव कमी राहावेत, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले. भारताच्या एकूण तांदूळ निर्यातीत बिगरबासमती तांदळाचे प्रमाण २५ टक्के आहे. बासमती आणि इतर प्रकारच्या तांदूळ निर्यातीवर भारताने निर्बंध घातलेले नाहीत. यावरून आयएमएफने मात्र जागतिक महागाईत भर घालणारा परिणाम होण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा >>> ऑनलाइन गेमिंगवरील २८ टक्के जीएसटी कायम, अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी परिषदेची २ ऑगस्टला बैठक
आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर गॉरिंचेस यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे जगभरात अन्नधान्याच्या भावात अस्थिरता निर्माण होते. याचे अनुकरण करून इतर देशही अशा प्रकारचे निर्बंध लादू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे निर्यात निर्बंध लादू नयेत, यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. कारण त्यांचा जागतिक पातळीवर असे निर्णय धोकादायक ठरतील.
भारताची बिगरबासमती तांदूळ निर्यात
आर्थिक वर्ष २०२२-२३ : ४२ लाख डॉलर
आर्थिक वर्ष २०२१-२२ : २६.२ लाख डॉलर सर्वाधिक निर्यात होणारे देश : अमेरिका, थायलंड, इटली, स्पेन, श्रीलंका