नवी दिल्ली : देशातील औद्योगिक उत्पादन दर सरलेल्या डिसेंबर २०२३ मध्ये ३.८ टक्क्यांनी वाढले, असे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. देशातील कारखानदारीतील गतिमानतेचे मापन असलेला औद्योगिक उत्पादन निर्देशांक नोव्हेंबर २०२३ मधील २.४ टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढले असले, तरी गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये हा निर्देशांक ५.१ टक्क्यांनी वाढला होता.
हेही वाचा >>> Gold-Silver Price on 12 February 2024: सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, १० ग्रॅम सोन्याचा भाव आता…
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून, सरलेल्या डिसेंबरमध्ये निर्मिती क्षेत्रातून उत्पादनवाढ ३.९ टक्के राहिली, जी आधीच्या वर्षीच्या याच महिन्यात ३.६ टक्क्यांनी वाढलेली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खाण उत्पादनात ५.१ टक्क्यांनी वाढ झाली तर वीज निर्मितीत १.२ टक्क्यांनी वाढ झाली.
एप्रिल-डिसेंबर २०२३ या कालावधीत औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ ६.१ टक्क्यांची राहिली आहे, जी आधीच्या वर्षातील याच नऊ महिन्यांत ५.५ टक्क्यांनी वाढली होती.