नवी दिल्ली : देशातील कारखानदारी क्षेत्राचे आरोग्यमान जोखणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) सरलेल्या सप्टेंबरमध्ये ३.१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. आधीच्या महिन्यांत म्हणजेच ऑगस्टमध्ये ते नकारात्मक असे उणे ०.१ टक्क्यांवर आक्रसले होते. करोना साथीच्या लाटेनंतर, २२ महिन्यांत पहिल्यांदाच ते उणे स्थितीत लोटले गेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील कारखान्यांतील उत्पादन सप्टेंबर २०२४ महिन्यांत सकारात्मक पातळीवर परतले असून, त्यात ३.१ टक्क्यांची वाढ दिसून आली. गत वर्षी म्हणजे सप्टेंबर २०२३ मध्ये ते ६.४ टक्क्यांनी वाढले होते. आकडेवारीनुसार सरलेल्या सप्टेंबरमध्ये खाणकाम, उत्पादन आणि वीज क्षेत्रातील वाढ अनुक्रमे ०.२ टक्के, ३.९ टक्के आणि ०.५ टक्के होती.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच सहा महिन्यांत तो ६.२ टक्क्यांनी वाढला होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India s industrial production rises 3 1 percent in september print eco news zws