डिजिटल पेमेंटमध्ये भारताने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अव्वल स्थान प्राप्त केले आहे. २०२२ मध्ये जगातील एकूण डिजिटल रिअल टाइम पेमेंटपैकी ४६ टक्के पेमेंट भारतात झालेत. क्रमवारीत भारताच्या खालोखाल येणाऱ्या चार देशांतील एकूण व्यवहारांपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. भारत सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये भारतात एकूण ८९.५ दशलक्ष रिअल टाइम डिजिटल व्यवहार झालेत, जे जगातील सर्वाधिक आहेत.
भारताने केला हा विक्रम
भारताने डिजिटल पेमेंटमध्ये मूल्य आणि व्हॉल्यूममध्ये एक नवीन रेकॉर्ड गाठला आहे, जे भारतीय पेमेंट सिस्टमची विश्वासार्हता दाखवते, असंही आरबीआयच्या तज्ज्ञांनी एएनआयला सांगितले. डिजिटल पेमेंटमध्ये भारताचे वर्चस्व कायम आहे. डिजिटल पेमेंटचा व्यापक स्वीकार केल्यामुळे भारत कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे, असंही MyGovIndia ने ट्विट केलेय.
हेही वाचाः पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता; पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले संकेत
डिजिटल पेमेंटमध्ये टॉप ५ देश
८९.५ दशलक्ष रिअल-टाइम पेमेंटसह भारत या यादीत अव्वल आहे. यानंतर ब्राझील २९.२ दशलक्ष व्यवहारांसह दुसऱ्या, चीन १७.६ दशलक्ष व्यवहारांसह तिसऱ्या, थायलंड १६.५ दशलक्ष व्यवहारांसह चौथ्या आणि दक्षिण कोरिया ८ दशलक्षांसह पाचव्या स्थानावर आहे.
हेही वाचाः PPF Vs SSY : १.५० लाख गुंतवून मिळवता येणार ६९ लाख रुपये, जाणून घ्या तुम्हाला अधिक परतावा कुठे मिळेल?
देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतोय
भारतात डिजिटल पेमेंट यशस्वी करण्याचे सर्वात मोठे श्रेय UPI ला जाते, जे २०१६ मध्ये लॉन्च झाले होते. डिजिटल पेमेंटमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आला आहे आणि याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होत आहे, असंही या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले होते.