नवी दिल्ली : जगातील अग्रणी उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंक कंपनीला भारतात उपग्रहाधारित संचार सेवा सुरू करण्यासाठी कवाडे खुली झाली असली तरी परवाना मिळविण्यासाठी त्यांना सर्व नियम आणि शर्तींची पूर्तता करावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय दूरसंचारमंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ

उपग्रहाधारित महाजाल सेवा पुरवठादार म्हणून सध्या भारती समूहाच्या वनवेब आणि मुकेश अंबानी यांच्या जिओ-एसईएस यांच्या संयुक्त भागीदारीतील जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन्सकडे परवाना आहे. स्टारलिंकनेही या आखाड्यात उतरून, भारतात सेवा सुरू करण्यासाठी अर्ज केला आहे. याबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरादाखल शिंदे म्हणाले की, एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकने सेवा पुरवठादार म्हणून परवाना मिळविण्यासाठीची बहुतांश प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कंपनीला परवाना दिला जाणार आहे. स्टारलिंकला परवाना मिळविण्यासाठी आधी सर्व नियमांची पूर्तता करावी लागेल. यात सुरक्षेच्या अंगानेही विचार करावा लागेल. कंपनीकडून परवाना मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना परवाना प्रदान केला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.