नवी दिल्ली : जागितक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे अजय बंगा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. बंगा यांच्या या नामांकनाला गुरुवारी भारतानेही पाठिंबा दिला.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ट्वीटच्या माध्यमातून बंगा यांच्या नामांकनाला पाठिंबा दर्शवला आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, “जागतिक बँकेचे नेतृत्व करण्यासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. बंगा यांच्या नावाला भारताचा पाठिंबा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील जागतिक बँकेकडे भारत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहात आहे. गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या मोठ्या संस्थांचे नेतृत्व करण्याचा अनुभव बंगा यांच्या गाठीशी आहे.”

हेही वाचा – मुंबईत एअरटेल ‘५ जी’ ग्राहक संख्या १० लाखांवर

हेही वाचा – रिलायन्स कॅपिटलचा आता फेरलिलाव; कंपनीच्या कर्जदात्या गटाला ‘एनसीएलएटी’ची परवानगी

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आठवडाभरापूर्वी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत बंगा हे जागतिक पातळीवरील संस्थेचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी सुयोग्य उमेदवार आहेत. जागतिक बँकेच्या संचालकांनी या नामांकनावर शिक्कामोर्तब केल्यास बंगा हे बँकेचे अध्यक्षपद भूषवणारे अमेरिकेतील भारतीय वंशांचे पहिले व्यक्ती असतील.

Story img Loader