नवी दिल्ली : खाद्यपदार्थ, विशेषत: भाज्या आणि उत्पादित खाद्य वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशातील घाऊक महागाई दर मे महिन्यात २.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे, असे शुक्रवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर सलग तिसऱ्या महिन्यांपासून वाढता राहिला असून तो आता १५ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते.

घाऊक महागाई दराचा या आधीचा उच्चांक फेब्रुवारी २०२३ मध्ये नोंदवला गेला होता, तेव्हा हा दर ३.८५ टक्के पातळीवर होता. गेल्या महिन्यात हा दर १.२६ टक्क्यांवर होता. तर गेल्यावर्षी याच महिन्यात म्हणजेच मे २०२३ मध्ये तो उणे (-) ३.६१ टक्के नोंदवला गेला होता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

खाद्यपदार्थ, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, खाद्य उत्पादने, इतर उत्पादन इत्यादींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे घाऊक महागाई दर आधीच्या महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात २ टक्क्यांपुढे गेला आहे. घाऊक महागाई दर २०२३ सालात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत नकारात्मक पातळीवर होता आणि नोव्हेंबरमध्ये प्रथमच तो शून्याच्या वर ०.२६ टक्क्यांसह सकारात्मक पातळीवर आला होता.

हेही वाचा >>> बजाज हाऊसिंग फायनान्सचा ‘सेबी’कडे ७,००० कोटींच्या ‘आयपीओ’साठी प्रस्ताव

अन्नधान्याच्या किंमतवाढीचा दर मे महिन्यात वाढून ९.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो एप्रिल महिन्यात ७.७४ टक्के नोंदवला गेला होता. भाजीपाल्यातील महागाई दर सर्वाधिक ३२.४२ टक्के होता, जो त्या आधीच्या एप्रिल महिन्यात २३.६० टक्के नोंदवण्यात आला होता. कांद्याच्या महागाई दरात महिनागणिक किंचित घट झाली असली तरी किमतवाढीचा दर वार्षिक तुलनेत ५८.०५ टक्क्यांवर आहे. आधीच्या महिन्यात कांद्याच्या किमती ५९.७५ टक्के दराने कडाडल्या होत्या. बटाट्याचा महागाई दर ६४.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर प्रथिनयुक्त आहार असलेल्या डाळींच्या महागाईत मे महिन्यात २१.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऊर्जा महागाई दर मेमध्ये १.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो एप्रिल महिन्यात १.३८ टक्के राहिला होता. उत्पादित वस्तूंचा महागाईचा दर ०.७८ टक्के आहे, जो एप्रिलमध्ये उणे (-) ०.४२ टक्के होता.

सरलेल्या मे महिन्यात घाऊक महागाई दराच्या विपरीत दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेला किरकोळ महागाई दर किंचित घटून ४.७५ टक्क्यांवर म्हणजेच वर्षभरातील नीचांकी पातळीवर रोडावला आहे. रिझर्व्ह बँक पतविषयक धोरण निश्चित करताना प्रामुख्याने किरकोळ महागाई दराचा विचार करते. तो २०२४-२५ या लक्ष्यित ४ टक्के पातळीवर येण्याची चिन्हे नसल्याने आठवड्यापूर्वी पार पडलेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत सलग आठव्यांदा रेपो दर अपरिवर्तित ठेवण्यात आला आहे.

Story img Loader