भारताचे आदित्य एल १ यान आज सकाळी ११.५० वाजता सूर्याच्या दिशेनं प्रक्षेपित झाले आहे. आदित्य एल १ ही भारताची पहिली अंतराळ मोहीम ठरणार आहे, ज्याद्वारे सूर्याचे निरीक्षण केले जाणार आहे. मात्र, चांद्रयान ३ प्रमाणे इस्रोने सूर्याभ्यास मोहिमेचे बजेट चीन आणि अमेरिकेपेक्षा कमी ठेवले आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इस्रोच्या सूर्याभ्यास मोहीम बजेटबाबतही जगभरात चर्चा जोरात सुरू आहे. चीनने नुकतेच आपले मिशन सूरज लाँच केले होते. त्यासाठी त्यांनी करोडोंचे बजेट वापरले. दुसरीकडे भारताने फक्त ४०० कोटी रुपयांच्या बजेटसह आदित्य एल १ तयार केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने आपले आदित्य एल वन यान यशस्वीरीत्या सूर्याजवळ पोहोचले तर इस्रो आणि भारत देश जगभरात प्रसिद्धी मिळवणार आहे. एवढेच नाही तर या मोहिमेच्या यशानंतर जगभरातील अवकाश संस्था पुन्हा एकदा इस्रोच्या पराक्रमाचा गाजावाजा आणि स्वीकार करतील. चीनशी तुलना केली तर भारत आपले मिशन अतिशय स्वस्तात पूर्ण करण्याचा विचार करीत आहे. अशा परिस्थितीत भारत सूर्याभ्यास मोहिमेच्या माध्यमातून चीनला आपली ताकद कशी दाखवणार हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

आदित्य एल १ अनेक प्रकारे चीनपेक्षा वेगळे

भारताचे आदित्य एल १ हे चीनच्या मिशन सूरजपेक्षा अनेक प्रकारे वेगळे आहे. चीनने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी नॅशनल स्पेस सायन्स सेंटरमधून Advanced Space Based Solar Observatory (ASO-S) किंवा Kuafu-1 लाँच केले होते. जर आपण त्याची आदित्य एल १ शी तुलना केली तर सर्वात मोठा फरक म्हणजे त्याची पृथ्वीपासूनची उंची आहे. ASO-S पृथ्वीपासून ७२० किमी उंचीवर आहे, तर आदित्य एल वनचे अंतर पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किमी असणार आहे. याशिवाय चीनच्या ASO-S चे वजन ८५९ किलो आहे. तर भारताचा आदित्य एल १ फक्त ४०० किलोचा आहे. यामध्ये आदित्य एल वन आणि ASO-S चे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वात खास आहे. कारण चीनचे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत आहे, तर इस्रोचे आदित्य एल १ पूर्णपणे त्याच्या बाहेर असेल. चीन जे करू शकला नाही ते भारत करणार आहे.

आदित्य एल वन ३७८ कोटींमध्ये बनवले

प्रक्षेपण खर्च वगळून इस्रोने या मिशनसाठी ३७८.५३ कोटी रुपयांचे बजेट तयार केले आहे. मात्र, यामध्ये लॉन्चिंगच्या खर्चाचा समावेश नाही. प्रक्षेपण खर्चाचा समावेश केल्यास तो सुमारे ४०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. आदित्य L1 चा L1 लॅग्रेंज पॉइंट १ चे प्रतिनिधित्व करतो. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील दोन महत्त्वाच्या बिंदूंपैकी हा एक आहे. त्यामुळे सूर्याविषयी माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचाः कच्च्या तेलावर विंडफॉल कर कपात, जाणून घ्या त्याचा काय परिणाम होणार?

हा प्रवास १२५ दिवस चालणार

या मोहिमेद्वारे L1 पॉइंटच्या आसपास ‘लॅग्रेंज पॉइंट’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, ज्याला १२५ दिवस लागू शकतात. इस्रोचे चांद्रयान ३ ही जगातील सर्वात स्वस्त चंद्र मोहीम आहे. यावरील खर्च हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी आहे. चांद्रयान ३ चे बजेट फक्त ६१५ कोटी रुपयांच्या जवळपास होते. दुसरीकडे सूर्याच्या मिशनचा खर्चही कमी आहे. इस्रोच्या चंद्र मोहिमेच्या निम्म्या खर्चात सूर्यावर जाण्याची तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचाः देशातील पाचवी सर्वात श्रीमंत महिला, त्यांच्याकडे २८ हजार कोटींची संपत्ती, कोण आहेत लीना तिवारी?

चीनला ६ महिने लागले

चीनने मिशन सूरजसाठी ६ महिन्यांचा बराच वेळ घेतला. अशा परिस्थितीत भारताचा आदित्य एल वन सूर्याजवळ पोहोचला, तर भारत आणखी एक इतिहास घडवू शकतो. चीनचे ASO-S हे जगातील पहिले अंतराळयान आहे, जे एकाच वेळी सोलर फ्लेअर्स आणि कोरोनल मास इजेक्शनचा अभ्यास करण्यास सक्षम आहे. अहवालानुसार, हा उपग्रह सूर्याचे चुंबकीय क्षेत्र, सौर ऊर्जा आणि कोरोनल मास इंजेक्शनशी संबंधित ५०० जीबी डेटा दररोज पृथ्वीवर पाठवतो.

म्हणून अर्थव्यवस्थेला फायदा होणार

भारताच्या चांद्रयान ३ च्या यशानंतर आणि सूर्याभ्यास मोहिमेनंतर अशी अपेक्षा आहे की, संपूर्ण जग अशा किफायतशीर अंतराळ मोहिमा सुरू करण्यासाठी भारताशी हातमिळवणी करेल. भारताच्या या क्षमतेचा फायदा अनेक मोठे देश घेऊ इच्छितात. इस्रोने स्वतःला जगातील सर्वात किफायतशीर अंतराळ मोहीम एजन्सी म्हणून स्थान मिळवून दिले आहे. एजन्सी आता व्यावसायिक लॉन्चिंगसाठी देखील पावले उचलत आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठी चालना मिळेल.

स्टार्टअपला चालना मिळणार

सध्या भारत सरकार तंत्रज्ञानाच्या विकासाकडे खूप लक्ष देत आहे. अशा परिस्थितीत अशा मोहिमेच्या यशामुळे भारताला मोठा दिलासा मिळणार आहे. देशातील अंतराळ आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक स्टार्टअप्सना याचा फायदा होऊ शकतो. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. याबरोबरच भारतीय स्टार्टअप्सनाही या क्षेत्रात उत्कृष्ट निधीची संधी मिळणार आहे.