पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कायम राहील, असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अहवालात सोमवारी वर्तविण्यात आला. देशांतर्गत भक्कम वित्तीय स्थिती आणि महागाईचा दर सौम्य राहण्याची अपेक्षा यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सप्टेंबरचा मासिक आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, पर्शियन आखातातील सुरू असलेल्या घडामोडी आणि परिस्थितीत होणाऱ्या बदलांनुसार खनिज तेलाच्या भावात वाढ होण्याची शक्यता यामुळे जागतिक पातळीवरील अनिश्चितता आहे. अमेरिकेत पतधोरण अजूनही कठोर पातळीवर असून, त्यामुळे वित्तीय स्थितीवर परिणाम होऊ शकतो. सध्या अमेरिकेतील भांडवली बाजारांमध्ये वाढ होण्यापेक्षा घसरण होण्याचा धोका अधिक आहे. जर घसरण झाली तर त्याचे परिणाम इतर बाजारांवरही होतील. भू-राजकीय तणावामुळे जागतिक पातळीवर जोखीम वाढू शकते. ही जोखीम आणखी वाढून कायम राहिल्यास त्याचा परिणाम भारतांसह इतर देशांतील आर्थिक घडामोडींवर होऊ शकतो.
चालू आर्थिक वर्षात भारताच्या समष्टी अर्थव्यवस्थेविषयक अनुमान चांगले आहेत. देशांतर्गत वित्तीय स्थिती भक्कम आहे. याचबरोबर क्रयशक्ती आणि गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे. आगामी रब्बी हंगामातील उत्पादनाने धान्यसाठ्यामध्ये सुधारणा होईल. खाद्यवस्तूंची महागाई कमी झाली असून, मूळ महागाईही कमी होत आहे. कमी झालेली व्यापारी तूट आणि पुरेशी परकीय गंगाजळी यामुळे भारताची बाह्य आर्थिक स्थिती चांगली आहे. रिझर्व्ह बँकेने निर्मिती, ग्राहक विश्वास, रोजगार आणि महागाईबाबत केलेल्या सर्वेक्षणांचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचे स्थान चालू आर्थिक वर्षात कायम राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही वर्तविला आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि भू-राजकीय आव्हाने असूनही भारताच्या आर्थिक ताकदीबाबत जागतिक विश्लेषकांचा आत्मविश्वास वाढत आहे.- केंद्रीय अर्थमंत्रालय