मुंबई : देशातील बँकिंग क्षेत्राचा एकत्रित निव्वळ नफा सरलेल्या २०२३- २४ आर्थिक वर्षात पहिल्यांदाच ३ लाख कोटी रुपयांच्या टप्प्यापुढे गेला आहे. उल्लेखनीय म्हणजे यात खासगी क्षेत्रातील बँकांचा एकत्रित निव्वळ नफा १.७८ लाख कोटी रुपये असा सरस असून, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा १.४१ लाख कोटी रुपये आहे. बँकिंग क्षेत्राच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कौतुक केले.

हेही वाचा >>> स्टेट बँक नव्या अध्यक्षांसाठी आज उमेदवारांच्या मुलाखती

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!

गेल्या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा खासगी बँकांचा निव्वळ नफा जास्त आहे. देशातील २६ खासगी बँकांनी १.७८ लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. याचवेळी १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकत्रितरूपात १.४१ लाख कोटी रुपयांचा नफा मिळविला. परिणामी बँकांचा एकत्रित निव्वळ नफा हा ३.१९ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. तज्ज्ञांच्या मते, बँकांच्या नफ्यात वाढ होण्यास प्रामुख्याने कर्ज वितरणात झालेली वाढ कारणीभूत ठरली आहे. याचवेळी बँकांच्या निव्वळ व्याज उत्पन्नातही भर पडली आहे. तसेच, बँकांनी बुडीत कर्जांचे प्रमाण कमी केल्याचाही परिणाम नफावाढीत दिसून येत आहे.

हेही वाचा >>> ऑइल इंडियाला तिमाहीत सर्वोच्च नफा; भागधारकांसाठी बक्षीस समभागाचीही घोषणा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांच्या या कामगिरीची नोंद समाज माध्यमातून कौतुकपर टिप्पणी करून सोमवारी घेतली. त्यांनी एक्स समाज माध्यमावरील टिप्पणीत म्हटले आहे की, आम्ही सत्तेत आलो त्यावेळी बँका तोट्यात होत्या आणि त्यांच्या बुडीत कर्जांचे प्रमाण जास्त होते. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळातील ‘फोन-बँकिंग’ धोरणामुळे हे घडले होते. गरिबांसाठी बँकांचे दरवाजे बंद होते. आता बँकांच्या स्थितीत सुधारणा झाली असून, गरीब, शेतकरी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्जे मिळू लागली आहेत.

आयटी क्षेत्राच्या नफाक्षमतेलाही मात

बँकांचा सरलेल्या आर्थिक वर्षातील एकत्रित नफा हा अलीकडच्या काळात परंपरेने सर्वात नफाक्षम क्षेत्र असलेल्या माहिती-तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर सेवा (आयटी) क्षेत्रालाही मात देणारा आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये, देशातील भांडवली बाजारात सूचीबद्ध आयटी सेवा कंपन्यांनी १.१ लाख कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला, जो बँकांच्या तुलनेत खूपच कमी आहे. इतकेच नव्हे तर नफ्याचा हा तीन लाख कोटी रुपयांचा आकडा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन तिमाहीत सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या एकत्रित तिमाही नफ्याशी बरोबरी साधणारा आहे.

Story img Loader