नवी दिल्ली : सरकारच्या पातळीवरील सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठबळामुळे देशातील नोंदणीकृत नवउद्यमींची (स्टार्टअप) उपक्रमांची संख्या ९२,६८३ पर्यंत वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी संसदेत दिली. हे नवउद्यमी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत कर आणि करेतर सवलती मिळविण्यासाठी पात्र आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात नवउद्यमी संस्कृतीला चालना देण्यासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने १६ जानेवारी २०१६ रोजी ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रम सरकारने सुरू केला होता. अर्थव्यवस्थेत वाढीसह, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे उद्दिष्ट यातून राखण्यात आले आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी लोकसभेत सांगितले. सरकारच्या या दिशेने सततच्या प्रयत्नांमुळे २०१६ मधील नवउद्यमींची संख्या ४४२ वरून २०२३ मध्ये (२८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत) मान्यताप्राप्त ९२,६८३ पर्यंत वाढली आहे. ७,००० हून अधिक मान्यताप्राप्त नवउद्यमी या बांधकाम, गृहोपयोगी सेवा, लॉजिस्टिक, गृह निर्माण आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ११,०९९, आरोग्य सेवा क्षेत्रात ८,६९१, शिक्षण ५,९६२, कृषी ४,६५३ आणि अन्न आणि पेयेसंबंधित क्षेत्रात ४,५२३ नवउद्यमी आहेत. देशभरात ६४० हून अधिक जिल्ह्यांमध्ये हे उपक्रम पसरलेले आहेत.