मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण तीव्र झाली असून त्याने ८४.०९ असा प्रति डॉलर नवीन नीचांक शुक्रवारी नोंदविला. आंतरबँक चलन व्यवहारात शुक्रवारी रुपया आणखी ११ पैशांनी घसरून इतिहासात प्रथमच त्याने ८४.१० ही नीचांकी पातळी दाखविली. भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अविरतपणे समभाग विक्रीचा मारा आणि गुंतलेला पैसा काढून घेण्याचा क्रम सुरू आहे. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारातील घसरणीने रुपया अधिक कमजोर झाला आहे. याचबरोबर आखाती देशांमधील भू-राजकीय अनिश्चिततेमध्ये खनिज तेलाच्या किमती वाढत चालल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमतीचा भडका आणि रुपयाची मूल्य घसरण याच्या एकत्रित परिणामाने तेलाच्या आयातीवर खर्चात लक्षणीय वाढ ही बाब एकंदर चलनवाढ आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने डोकेदुखी वाढवणारी ठरेल.

आंतरबँक परकीय चलन बाजारात शुक्रवारच्या सत्रात रुपयाने ८३.९७ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस ११ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ८४.०९ या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले. सत्रादरम्यान ते ८४.१० पातळीपर्यंत गडगडले होते. गुरुवारच्या सत्रात रुपया ८३.९८ या पातळीवर स्थिरावले होते. जगभरात सर्वत्रच बड्या गुंतवणूकदारांची जोखीमयुक्त मालमत्तांमधून माघार सुरू असून, तुलनेने सुरक्षित पर्यायांकडे त्यांचा पैसा वळला आहे. परिणामी सर्वच प्रमुख जागतिक चलनांचा मूल्य ऱ्हास सुरू आहे. अमेरिकेत रोख्यांच्या परतावा दरातील वाढ ही अमेरिकी डॉलरला मिळत असलेल्या मजबुतीचेच ते प्रतिबिंब आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर

हेही वाचा : प्रत्यक्ष कर संकलन १८ टक्के वाढीसह ११.२५ लाख कोटींवर

आणखी कमकुवतपणा शक्य

चालू वर्षात ८ ऑगस्टपासून रुपयाला प्रति डॉलर ८४ रुपये पातळीच्या आत ठेवण्यास रिझर्व्ह बँक प्रयत्नशील होती. देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा केला, हा निधी डॉलररूपाने माघारी जात असल्याने त्याने रुपयाच्या मूल्यावर ताण आणला, असे मत फिनरेक्स ट्रेझरी ॲडव्हायझर्सचे कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी यांनी व्यक्त केले. येत्या काळात रुपया ८४.२५ या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. इराण-इस्रायल-लेबनॉन यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. परिणामी खनिज तेलाचे भाव आणखी वाढण्याची आणि रुपया अधिक कमजोर होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. सध्या डॉलर निर्देशांक ०.०९ टक्क्यांनी घसरून १०२.८९ पातळीपर्यंत खाली आला आहे.