मुंबई : अमेरिकेतील चलनवाढीच्या जाहीर होऊ घातलेल्या आकडेवारीबाबत साशंकतेतून, देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारच्या सत्रात मर्यदित पातळीत व्यवहार करत स्थिरावले.

बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १६.०९ अंशांची किरकोळ वाढ झाली आणि तो ८१,५२६.१४ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३१.७५ अंशांनी वाढून २४,६४१.८० पातळीवर बंद झाला.

Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rupee continues to decline against dollar print eco news
रुपया ८५.८७ च्या गाळात!
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
GDP growth likely to be limited to 6 3 percent ​​State Bank print eco news
जीडीपी वाढ ६.३ टक्क्यांवरच मर्यादित राहण्याची शक्यता – स्टेट बँक
lowest exchange rate of the Indian currency the rupee
रुपयाची घसरगुंडी सुरूच; प्रति डॉलर ८५.८४ चा नवीन तळ
Bombil , Saranga, low visibility , fish price ,
कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ
sensex 1436 points higher
चौखूर तेजीत ‘सेन्सेक्स’ची १,४३६ अंश कमाई

हेही वाचा : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर

जगभरातील गुंतवणूकदार अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीकडे लक्ष ठेवून आहे. त्या परिणामी जागतिक बाजारपेठेत संमिश्र वातावरण होते. महागाईची ही आकडेवारी अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणावर परिणाम करू शकते. एकंदर साशंकतेने गुंतवणूकदारांच्या सावध पवित्र्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात नगण्य वाढ झाली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, मारुती, भारती एअरटेल आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे समभाग वधारले. तर जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्र, ॲक्सिस बँक, टायटन आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात घसरण झाली.

हेही वाचा : इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग

सेन्सेक्स ८१,५२६.१४ १६.०९ (०.०२%)

निफ्टी २४,६४१.८० ३१.७५ (०.१३%)

डॉलर ८४.८४ -१ पैसा

तेल ७२.९० ०.९८%

Story img Loader