मुंबई: रोखरहित देयक व्यवहारासाठी भारतातील लोकप्रिय प्रणाली ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ अर्थात यूपीआयचा वापर आता नेपाळमध्ये सुरू झाला आहे, अशी घोषणा या प्रणालीची विकसक नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी केली. यामुळे यूपीआय वापरकर्ते क्यूआर कोड स्कॅन करून नेपाळी व्यापाऱ्यांना पैसे पाठवून देयक व्यवहार पूर्ण करू शकतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 8 March 2024: सोन्याची चकाकी वाढली; गाठला नवा उच्चांक, जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल पेमेंट्स (एनआयपीएल) आणि नेपाळमधील सर्वांत मोठे देयक नेटवर्क ‘फोनपे पेमेंट सर्व्हिस’ यांच्यात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भागीदारी झाली होती. यातील पहिल्या टप्प्यात भारतीय ग्राहकांना यूपीआयद्वारे नेपाळमधील व्यवसायांना तात्काळ, सुरक्षित आणि सहजपणे पैसे पाठवता येतील. फोनपे नेटवर्कचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना यूपीआयद्वारे पैसे स्वीकारता येणार आहेत. दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये सीमापार व्यवहार वाढविण्यासाठी हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. याबाबत एनआयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश शुक्ला म्हणाले की, डिजिटल व्यवहार क्षेत्रात नावीन्य आणण्याबद्दलची आमची कटिबद्धता दर्शविणारा हा उपक्रम आहे. त्यातून व्यापारासाठी नवीन संधी निर्माण होतील आणि दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ होतील.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians can make payments through upi in nepal print eco news zws