मुंबई: देशाच्या परकीय चलन गंगाजळीला लागलेली गळती सुरूच असून, १० जानेवारीला संपलेल्या आठवड्यात ती ८.७१ अब्ज डॉलरने घसरून ६२५.८७ अब्ज डॉलरपर्यंत ओसरली, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दिली. याआधी ३ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा ५.६९ अब्ज डॉलरने घसरून ६३४.५८ अब्ज डॉलरवर स्थिरावला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> तब्बल ९० हजार  पगारदारांच्या कर वजावटीत गल्लत ; सुमारे १,०७० कोटींची सदोष करबचत केल्याचा उलगडा

डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रयत्न सुरू केले आहेत. रुपयातील अस्थिरता कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने स्थानिक चलन बाजारात केलेल्या हस्तक्षेपातून चलन गंगाजळीमध्ये घसरण सुरू आहे. सप्टेंबरच्या अखेरीस परकीय चलन साठा ७०४.८८ अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहचला होता. त्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाची नीचांकी घसरणीचा क्रम सुरू झाला आणि ऑक्टोबरच्या मध्यापासून तो तीव्र झाला. देशाच्या अर्थव्यवस्थेची मंदावलेली चाल, परकीय निधीचे बहिर्गमन, अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची संभाव्य व्यापार धोरणे आणि फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीमध्ये हात आखडता घेतल्याने अमेरिकी डॉलरला सशक्तता, तर रुपयाचे दुबळेपण वाढले आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या नियमित हस्तक्षेपामुळे चलन मूल्यातील ऱ्हास काहीसा रोखला गेला आहे.

हेही वाचा >>> Gold Silver Price Today : सोन्या- चांदीच्या दरात मोठे बदल, तुमच्या शहरात आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर किती? वाचा

रुपयासाठी १८ महिन्यांतील सर्वात वाईट आठवडा

सरलेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया ०.६ टक्क्यांनी घसरला आहे. ही जुलै २०२३ नंतरची स्थानिक चलनातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे. सलग अकराव्या आठवड्यात घसरण नोंदवत, रुपयाने ८६ च्या पलीकडे गटांगळीही घेतली. मंगळवारी त्याने ८६.६४ या ऐतिहासिक नीचांकी पातळीपर्यंत लोळण घेतली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीतील धोरणात्मक बदलांच्या अपेक्षांमुळे अमेरिकी डॉलरला बळकटी आली आहे आणि याचा परिणाम जगभरातील उदयोन्मुख बाजारातील चलनांवर होत आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ८५ वरून ८६, तर प्रति डॉलर ८४ वरून ८५ पर्यंत घसरण रुपयाने सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत दाखविली आहे. नववर्षात जानेवारीमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजारातून सुमारे ६०० कोटी डॉलरचा (सुमारे ५२,००० कोटी रुपये) निधी माघारी घेतला आहे, ज्यामुळे रुपयासमोरील आव्हानांमध्ये भर पडली आहे.