पीटीआय, नवी दिल्ली
भारताच्या विकास दर चालू २०२३-२४ आर्थिक वर्षात ६.४ टक्के राहण्याचा अंदाज एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) बुधवारी कायम ठेवला. ग्रामीण आणि शहरी भागातील क्रयशक्तीत होत असलेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग कायम राहणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. मात्र, जागतिक मंदीमुळे निर्यातीत होणारी घट विकास दरासाठी अडसर ठरू शकते, असा इशाराही तिने दिला आहे.
आणखी वाचा- टाटा समूह ब्रिटनमध्ये गिगा कारखाना उभारणार, सुनक म्हणाले…”हा अभिमानाचा…”
मागील २०२२-२३ आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ७.२ टक्के होता. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अंदाजानुसार, देशातील महागाईचा दर चालू आर्थिक वर्षात ४.९ टक्के राहील. जून महिन्यात तो ४.८१ टक्के नोंदविण्यात आला होता. खनिज तेलाच्या भावात घसरण होत असली तरी महागाईचा आलेख चढता राहील. सरासरी पाऊस व इतर हवामान घटक सामान्य राहिल्यास आणि भू-राजकीय संघर्षात वाढ न झाल्यास भारताचा विकास दर चालू वर्षी ६.४ टक्के राहील. पुढील आर्थिक वर्षात तो ६.७ टक्क्यांवर जाईल.
चालू वर्षात ग्रामीण आणि शहरी क्रयशक्तीत वाढ होणे अपेक्षित आहे. ग्राहक आत्मविश्वास, शहरी बेरोजगारी आणि दुचाकींची विक्री यात सुधारणा दिसून येत आहे. चालू वर्षात गुंतवणुकीतील वाढ चांगली राहणार असून, बँकांच्या कर्ज वितरणातही वाढ होईल. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होत नसल्याने घरांची मागणी कायम राहील, असे एडीबीने म्हटले आहे.