मुंबई: जगभरात भांडवली बाजारात नव्याने जागे झालेला आशावाद आणि त्यापायी हळुवार सुरू झालेल्या तेजीवर स्वार होत, स्थानिक बाजारात सलग दुसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांनी वाढ साधली. बँकांच्या समभागात स्वारस्य वाढून झालेली जोमदार खरेदी हे बुधवारच्या व्यवहारांचे वैशिष्टय़ ठरले. तेजीचा प्रवाह अबाधित ठेवत, सेन्सेक्सने बुधवारी ९१.६२ अंशांनी (०.१५ टक्क्यांनी) वाढून ६१,५१०.५८ वर दिवसाला निरोप दिला. दिवसभरात हा निर्देशांक ३६१.९४ अंशांनी वाढून ६१,७८०.९० वर पोहोचला. त्याचबरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २३.०५ अंशांनी (०.१३ टक्क्यांनी) वाढून  १८,२६७.२५ या पातळीवर दिवसअखेरीस विश्राम घेतला. सेन्सेक्समधून, स्टेट बँक, बजाज फायनान्स, डॉ रेड्डीज, कोटक मिहद्रा बँक, सन फार्मा, मारुती, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक हे समभाग दमदारपणे वाढले. तर पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, टायटन, भारती एअरटेल आणि बजाज फिनसव्‍‌र्ह हे समभाग घसरणीत राहिले.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हच्या १-२ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीचे इतिवृत्त गुरुवारी प्रसिद्धी केले जाईल. यातून फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या सदस्यांची व्याजदर वाढीसंबंधाने भूमिका नरमल्याचे संकेत मिळतील, या आशावादाने बाजारात खरेदीचे चैतन्य पसरले. घसरणारा डॉलर निर्देशांक आणि घसरत जाणारे रोखे उत्पन्न यामुळे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विक्रीच्या माऱ्यापासून स्थानिक बाजाराला अल्पकालीन दिलासा मिळाला, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी निरीक्षण नोंदविले. व्यापक बाजारपेठेत खरेदी बहर होता, परिणामी बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.५४ टक्क्यांनी आणि मिडकॅप निर्देशांक ०.२० टक्क्यांनी वाढला.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

विकासदर अंदाजात कपात; मात्र ‘गोल्डमन सॅक्स’चे निफ्टीसाठी २०,५००चे लक्ष्य 

मुंबई : अमेरिकेची आघाडीची दलाली पेढी गोल्डमन सॅक्सने, आगामी २०२३ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ५.९ टक्के दराने वाढ साधेल असा अंदाज वर्तवला. याआधी तिने वर्तविलेल्या ६.९ टक्के दराने वाढीच्या अंदाजात त्यामुळे पूर्ण एक टक्क्याची घसरण करणारी सुधारणा झाली आहे. त्याचवेळी सलग दोन वर्षांच्या तेजीच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजाराच्या कामगिरीबाबत मात्र गोल्डमन सॅक्सने आशावाद व्यक्त केला आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत प्रमुख निर्देशांक ‘निफ्टी’ २०,५०० च्या पुढील पातळी गाठेल, अशी तिची अपेक्षा आहे. म्हणजे सध्याच्या पातळीवरून १२ टक्के परतावा निफ्टीकडून मिळेल, असे तिने म्हटले आहे. या दलाली पेढीने ‘सेन्सेक्स’साठी कोणतेही लक्ष्य निश्चित केलेले नाही.

Story img Loader