मुंबई: जगभरात भांडवली बाजारात नव्याने जागे झालेला आशावाद आणि त्यापायी हळुवार सुरू झालेल्या तेजीवर स्वार होत, स्थानिक बाजारात सलग दुसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांनी वाढ साधली. बँकांच्या समभागात स्वारस्य वाढून झालेली जोमदार खरेदी हे बुधवारच्या व्यवहारांचे वैशिष्टय़ ठरले. तेजीचा प्रवाह अबाधित ठेवत, सेन्सेक्सने बुधवारी ९१.६२ अंशांनी (०.१५ टक्क्यांनी) वाढून ६१,५१०.५८ वर दिवसाला निरोप दिला. दिवसभरात हा निर्देशांक ३६१.९४ अंशांनी वाढून ६१,७८०.९० वर पोहोचला. त्याचबरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २३.०५ अंशांनी (०.१३ टक्क्यांनी) वाढून १८,२६७.२५ या पातळीवर दिवसअखेरीस विश्राम घेतला. सेन्सेक्समधून, स्टेट बँक, बजाज फायनान्स, डॉ रेड्डीज, कोटक मिहद्रा बँक, सन फार्मा, मारुती, एनटीपीसी, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक हे समभाग दमदारपणे वाढले. तर पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, टायटन, भारती एअरटेल आणि बजाज फिनसव्र्ह हे समभाग घसरणीत राहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा