मुंबई : निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या आघाडीच्या समभागांमध्ये झालेल्या नफावसुलीने शुक्रवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उच्चांकी पातळीवरून माघारी फिरले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २६४.२७ अंशांनी घसरून ८५,५७१.८५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १४२.१३ अंशांची कमाई करत ८५,९७८.२५ या सर्वोच्च शिखराला स्पर्श केला. मात्र, बँकिंग आणि ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या घसरणीने दुपारच्या सत्रात निर्देशांकाने नकारात्मक पातळीत प्रवेश केला. सलग सहा सत्रातील तेजीनंतर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३७.१० टक्क्यांनी घसरला आणि तो २६,१७८.९५ पातळीवर बंद झाला.

Pune leads the country in affordable housing
परवडणाऱ्या घरांमध्ये पुणे देशात आघाडीवर! मागणी सर्वाधिक कुठे अन् किमती जाणून घ्या…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Sensex, Indexes record high, Sensex latest news,
निर्देशांकांची विक्रमी शिखरझेप! सेन्सेक्स ८५ हजारांच्या वेशीवर
cyber crimes on name of increasing subscriber likes and followers on social media
सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची बातमी… लाईक्स, फालोअर्स आणि सबस्क्राईबर…
Sensex hits two century high
‘फेड’च्या व्याजदर कपातीनंतर निर्देशांकांची उच्चांकी मुसंडी, सेन्सेक्सची दोन शतकी उसळी
Bajaj Housing Finance
बजाज हाउसिंग फायनान्सच्या समभागात पदार्पणालाच १३६ टक्के वाढ, वर्षातील चौथी सर्वोत्तम सूचिबद्धता
sensex drop 202 points to settle at 82352 nifty end at 81833
Stock Market Today : ‘निफ्टी’ची १४ सत्रांतील अविरत तेजीनंतर माघार; ‘सेन्सेक्स’मध्ये दोन शतकी घसरण
Factory activity at three-month low Production PMI Index at 57.5 points in August
कारखानदारीचा वेग तीन महिन्यांच्या नीचांकाला, निर्मिती ‘पीएमआय निर्देशांक’ ऑगस्टमध्ये ५७.५ गुणांवर

हेही वाचा >>>Aakriti Chopra Resings Zomato : झोमॅटोच्या सहसंस्थापक आकृती 

अलीकडील विक्रमी तेजीनंतर, अनुकूल जागतिक संकेतांना न जुमानता गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी तिमाहीतील कामगिरी सकारात्मक राहण्याच्या आशावादाने निर्देशांकातील घसरण मर्यादित राहिली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान देणाऱ्या कंपन्यांच्या समभागांमधील संमिश्र कामगिरीमुळे बाजाराची गती कमी झाली, असे मत जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक, लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्ट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. तर सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग तेजीसह बंद झाले.

सेन्सेक्स ८५,५७१.८५ -२६४.२७ (-०.३१%)

निफ्टी २६,१७८.९५ -३७.१० (-०.१४%)

डॉलर ८३.७० ४

तेल ७१.५८ -०.०३