देशातील हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपनी इंडिगोने एअरबसकडून ५०० छोट्या विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. हा करार नागरी हवाई वाहतूक क्षेत्रासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर शिंदे म्हणाले की, आधी एअर इंडियाने ४७० विमाने खरेदी करण्याची मागणी नोंदवली होती. त्यात एअरबसकडून २५० आणि बोइंगकडून २२० विमाने खरेदी केली जाणार आहेत. आता भारताने त्यापुढील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जगातील सर्वांत मोठ्या विमान उत्पादक कंपनीकडे आतापर्यंतची सर्वांत मोठी विमानांची मागणी इंडिगो या भारतीय कंपनीने नोंदवली आहे. कोणत्याही प्रवासी विमान कंपनीकडून झालेल्या ही आतापर्यंतची सर्वांत मोठी खरेदी आहे.
हेही वाचाः अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता
हवाई वाहतूक क्षेत्रातील गुंतवणुकीचे अनेक पट परिणाम दिसून येतात. हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने होणारे परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात गुंतविलेला प्रत्येक डॉलर हा वाढीचा विचार करता तिप्पट परतावा देतो. त्याचा परिणाम रोजगारावरही होतो, असे शिंदे यांनी नमूद केले.
हेही वाचाः ५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी
इंडिगोने रचला नवा इतिहास
भारतातील विमान वाहतूक कंपनी इंडिगोने नवा इतिहास रचला आहे. इंडिगोने ५०० A320 विमानांची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरनंतर इंडिगो सर्वात मोठी विमान खरेदी करणारी कंपनी बनली आहे. मार्च महिन्यात टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडियाने ४७० खरेदी करण्याचा करार केला होता. आता हा विक्रम इंडिगोने मोडला आहे.