भारतातील सर्वात मोठी एअरलाइन्स इंडिगो सोमवारी एअर इंडियाचा विक्रम मोडून नवा इतिहास रचण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो ५०० विमानांच्या ऑर्डरला मंजुरी देऊ शकते. या ऑर्डरचे एकूण मूल्य ५०० अब्ज डॉलर्स म्हणजेच ४१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, परंतु मूळ रक्कम यापेक्षा खूपच कमी असू शकते. याचे कारण म्हणजे कंपन्यांना अशा मोठ्या ऑर्डर्सवर भरघोस सूटही मिळते. इंडिगोने A320 निओ फॅमिली एअरक्राफ्टची ऑर्डर दिली आहे. A320neo कुटुंबात A320neo, A321neo आणि A321XLR विमानांचा समावेश आहे.

७०० हून अधिक विमानांचे लक्ष्य

मार्च महिन्यात एअर इंडियाकडून ४७० विमानांची ऑर्डर दिल्यानंतर इंडिगोची विमान वाहतूक इतिहासातील ही सर्वात मोठी ऑर्डर असेल. इंडिगोला २०३० पर्यंत एकाच A320 कुटुंबातील ४७७ विमानांची डिलिव्हरी बाकी आहे. या निर्णयामुळे पुढील दशकात एअरलाइन्सला नवीन विमानांचा अखंड पुरवठा होणार आहे. इंडिगोचा सध्या भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेत ६० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. इंडिगोने २०३० पर्यंत १०० विमाने निवृत्त करण्याच्या तयारीत आहे. अशातच एअरलाइन्सला डिलिव्हरी स्लॉट्सची खातरजमा करून घ्यायची आहे, जेणेकरून ताफ्यात असलेल्या विमानांची संख्या स्थिर राहील. येत्या दशकात कंपनीला ७०० पेक्षा जास्त विमानं ताफ्यात ठेवण्यासाठी नवीन विमानांची गरज आहे.

Immigration policy of Donald Trump
अन्यथा : प्रगतीच्या प्रारूपाचा प्रश्न!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश

कंपनीचे आंतरराष्ट्रीय नियोजन

एअरलाइन्स ३०० लांब पल्ल्याच्या A321 निओ आणि A321 एक्सएलआर विमानांची ऑर्डर देण्याची शक्यता आहे. ही लांब पल्ल्याची विमाने आठ तासांपर्यंत उड्डाणे करू शकतात आणि इंडिगोच्या युरोपमधील विस्तार योजनांसाठी ते महत्त्वाचे ठरतील. एअरलाइन्स सध्या ७५ आंतरराष्ट्रीय शहरांच्या जोड्यांसह २६ आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उड्डाण करते. इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांनी यापूर्वी सांगितले होते की, एअरलाइन्सने आपला आंतरराष्ट्रीय सीट वाटा आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २३ टक्क्यांवरून पुढील दोन वर्षांत ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे.

हेही वाचाः २०३० पर्यंत सोलर बाजारातही रिलायन्सचा दबदबा वाढणार अन् ६० टक्के वाटा होणार, अंबानींनी बनवला जबरदस्त प्लॅन

कंपनीचे शेअर्स ३० टक्क्यांनी वाढले

गेल्या तीन महिन्यांत इंडिगो एअरलाइन्सच्या शेअरच्या किमतीत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, त्यामुळे कंपनीचा शेअर २४२६ रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत कंपनीचे बाजारमूल्य सुमारे ९४,००० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. खरं तर GoFirst ग्राउंड झाल्यानंतर कंपनीचा स्टॉक वाढला आहे. GoFirst ग्राउंड झाल्यानंतर इंडिगो आणि इतर विमान कंपन्यांना खूप फायदा झाला. या काळात मागणी जास्त आणि कमी पुरवठा यामुळे त्यांनी वाढलेल्या किमतीचा फायदा घेतला.

हेही वाचाः निर्गुंतवणुकीकडे महसूल निर्मितीचे साधन म्हणून नव्हे तर…; पत सुधारणेसाठी मोदी सरकारच्या अधिकाऱ्यांचे मूडीजला साकडे