भारतातील विमान वाहतूक कंपनी इंडिगोने नवा इतिहास रचला आहे. इंडिगोने ५०० A320 विमानांची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरनंतर इंडिगो सर्वात मोठी विमान खरेदी करणारी कंपनी बनली आहे. मार्च महिन्यात टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडियाने ४७० खरेदी करण्याचा करार केला होता. आता हा विक्रम इंडिगोने मोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या बोर्डाने ५० अब्ज रुपयांची विमान खरेदीसाठी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुढील दशकात एअरलाइन्सला नवीन विमानांचा अखंड पुरवठा होणार आहे. इंडिगोचा सध्या भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेत ६० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. इंडिगोने २०३० पर्यंत १०० विमाने निवृत्त करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा : बाजारातून ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब; आता RBI म्हणते…
गेल्या तीन महिन्यांपासून इंडिगो एअरलाइन्सच्या शेअरच्या किमतीत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर २४२६ रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत कंपनीचे बाजारमूल्य सुमारे ९४,००० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.