पुणे : पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उभारणीचे साधन असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या (इन्व्हिट्स) माध्यमातून सध्या या क्षेत्रातील ४ लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले जात आहे. पुढील दशकात त्यात ६ ते ८ लाख कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे, असे इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी मेघना पंडित यांनी बुधवारी प्रतिपादन केले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 27 March 2024: सोन्याच्या किमतीमध्ये वाढ सुरुच, तर चांदीची चकाकी उतरली, पाहा आजचे दर

इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इन्व्हिट्स) २०१४ मध्ये भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले. देशात सध्या ‘सेबी’कडे नोंदणीकृत २४ इन्व्हिट्स असून त्यांनी २०१९ पासून १ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे. यापैकी १४ इन्व्हिट्स खासगीरित्या सूचिबद्ध आहेत आणि ४ सार्वजनिकरित्या सूचिबद्ध आहेत. सार्वजनिकरित्या सूचीबद्ध असलेल्या ४ इनव्हिट्सचे एकत्रित बाजार भांडवल २५ हजार कोटी रुपये आहे. इंडिया ग्रिड ट्रस्टने जून २०१७ मध्ये सूचिबद्ध झाल्यापासून डिसेंबर २०२३ पर्यंत प्रति युनिट ८२.४१ रुपये गुंतवणूकदारांना वितरित केले असून, ही एकूण रक्कम ४,६६७ कोटी रूपये आहे, असे पंडित यांनी सांगितले. गेल्या दशकभरात देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यात गुंतवणुकीसाठी इन्व्हिट्स हा सुयोग्य पर्याय आहे. यामुळे विकसकांना नवीन विकास प्रकल्पांत गुंतवणुकीसाठी त्यांचे भांडवल मुक्त करण्याची संधी मिळते. तसेच, गुंतवणूकदारांना स्थिर परतावा मिळवण्याची संधीही उपलब्ध होते, असे पंडित यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indigrid cio meghana pandit talks about future investment flow in invit print eco news zws