मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या इंडसइंड बँकेला सप्टेंबरअखेर दुसऱ्या तिमाहीत १,३३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून त्यात वार्षिक तुलनेत ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचे प्रतिकूल पडसाद शुक्रवारी कंपनीच्या समभागावर शुक्रवारी उमटले. बुडीत कर्जामध्ये लक्षणीय वाढ झाली असून सप्टेंबर तिमाहीत एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण वर्षभरापूर्वीच्या १.९३ टक्क्यांवरून सप्टेंबर २०२४ अखेर २.११ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) ०.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. जे मागील वर्षी ०.५७ टक्के राहिले होते. या कारणाने बँकेच्या तरतुदीत दुपटीने वाढ होऊन, ती आता १,८२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, गेल्यावर्षी ती ९७४ कोटी राहिली होती. याबरोबरच बँकेचा परिचालन खर्चदेखील वाढल्याने त्याचा नफ्यावर विपरीत परिणाम दिसून आला. थकलेली कर्जे ही मुख्यत: सूक्ष्मवित्त अर्थात मायक्रोफायनान्स संस्थांच्या माध्यमातून वितरित केली गेली होती, असे दिसून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा