पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानला जाणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) जून महिन्यात ३.७ टक्क्यांवर सीमित राहिल्याचे शुक्रवारी अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले. उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जाणाऱ्या या निर्देशांकाचा हा तीन महिन्यांतील नीचांक स्तर असून, या आधी म्हणजे मे २०२३ मध्ये त्यात ५.३ टक्के वाढ, तर गेल्या वर्षी जून महिन्यात तो १२.६ टक्क्यांनी वाढला होता.

सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, निर्मिती क्षेत्राची वाढ जूनमध्ये ३.१ टक्क्यांवर मर्यादित राहिली. ती गेल्या वर्षी याच कालावधीत (जून २०२२) १२.९ टक्के नोंदवली गेली होती. तर वीजनिर्मिती क्षेत्र ४.२ टक्के, खाण उद्योग क्षेत्राने ७.६ टक्के वाढ नोंदवून समाधानकारक कामगिरी केली आहे. एप्रिल ते जून २०२३ तिमाहीसाठी ‘आयआयपी’मध्ये एकत्रित ४.५ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे, २०२२ मध्ये याच तिमाहीत त्यात १२.९ टक्के दराने विस्तार झाला होता.

आणखी वाचा-नाणेनिधीतील कोट्याचा जलद पुनर्विचार आवश्यक, रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे आग्रही मत

औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजे काय?

ज्याप्रमाणे आपण व्यवहारात वापरतो त्या वस्तू आणि सेवांचे मूल्य कमी अथवा जास्त झाले हे समजून घ्यायचे असेल तर आपण महागाई निर्देशांक विचारात घेतो,त्याचप्रमाणे देशात ठरावीक कालावधीत औद्योगिक उत्पादनात वाढ किंवा घट झाली हे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन म्हणजेच ‘आयआयपी’ या निर्देशांकातून समजते. देशाच्या दीर्घकालीन प्रगतीचा कणा म्हणजेच देशातील द्वितीयक (सेकंडरी) क्षेत्र अर्थात कारखानदारी उद्योग! कोणत्याही कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करणे, वस्तूचे मूल्य वाढवणे हे काम कारखानदारी उद्योगात केले जाते. उद्योग हे रोजगारनिर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतात. उद्योगात तयार होणाऱ्या वस्तू या अधिकाधिक प्रमाणात तयार झाल्या याचा अर्थ औद्योगिक क्षेत्राला सुगीचे दिवस आले असे आपण म्हणू शकतो.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrial production fell in june record low in three months print eco news mrj
Show comments