पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) सरलेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ५.६ टक्क्यांपुढे मजल मारल्याचे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. हा निर्देशांक देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जातो. गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक १.२ टक्के नोंदवण्यात आला होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील महत्त्वाचा घटक म्हणजे निर्मिती क्षेत्राने फेब्रुवारी महिन्यात ५.३ टक्के वाढ नोंदवली, तर खाणकाम तसेच वीजनिर्मिती क्षेत्राने अनुक्रमे ४.६ आणि ८.२ टक्के दराने वाढ साधून योगदान दिले.

जानेवारी २०२३ साठी, औद्योगिक उत्पादन निर्देशांक वाढीचा आकडा पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ५.२ टक्क्यांवरून, फेरमूल्यांकनानंतर ५.५ टक्क्यांपर्यंत सुधारण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. डिसेंबर २०२२ मध्ये हा दर ४.३ टक्के नोंदविला गेला. आर्थिक वर्षा २०२२-२३ च्या पहिल्या ११ महिन्यांत, आधीच्या मागील वर्षातील सरासरी १२.५ टक्क्यांच्या तुलनेत ५.५ टक्क्यांनी वाढला. औद्योगिक निर्देशांकाला कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेष महत्त्व असते. ते देशाच्या अर्थव्यवस्थेत उद्योगप्रणीत विकास कोणत्या गतीने होत आहे, याचे निदर्शक असते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrial production index iip increased in the month of february amy
Show comments