नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण दक्षिण आशियाई देशांनी महागाई नियंत्रणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. अनियंत्रित किंमतवाढीमुळे विकास आणि गुंतवणुकीला धोका निर्माण होण्याची भीती रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना दास म्हणाले, किमतीच्या निरंतर दबावाबरोबरच कर्जाची वाढती पातळी या क्षेत्रातील आर्थिक विकासाला धोका निर्माण करू शकते. करोनामुळे जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय, युक्रेनमधील युद्धानंतर उद्भवलेले अन्न आणि ऊर्जा संकट आणि जगभरातील मध्यवर्ती बँकाकडून कठोर पतविषयक धोरण राबविल्यामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या रूपात अनेक बाह्य धक्के दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थांमध्ये सतत किमतीवर दबाव आणत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती

आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तीन तिमाहीत, दक्षिण आशियातील खाद्यपदार्थाच्या किमतीतील सरासरी महागाईचा दर २० टक्क्यांहून अधिक राहिला आहे. मात्र अलीकडच्या काळात वस्तू आणि सेवांच्या किमतीतील नरमाईमुळे त्याची परिणती एकंदर महागाई कमी होण्यात झाली आहे. मात्र प्रतिकूल घटनांमुळे पुन्हा महागाई दर उच्च पातळीवर पोहोचल्यास विकास आणि गुंतवणुकीवर परिणाम करू शकतो. देशातील एकूण गरजेच्या ८० टक्के इंधनाची आयातीवर मदार असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर आयातीत महागाईचा धोका निर्माण झाला आहे. महागाई नियंत्रणासाठी, पुरवठय़ाच्या बाजूने हस्तक्षेपांसह पतविषयक धोरण, वित्त-व्यापार धोरण आणि सरकारी उपाययोजना ही प्रमुख साधने बनायला हवीत, असेही दास यांनी सुचविले.

भारताची स्थिती मजबूत

आशिया खंडात पाकिस्तान आणि श्रीलंकेत महागाई सर्वाधिक आहे. राजकीय अस्थिरता आणि वाढत्या महागाईमुळे श्रीलंकेकडील परकीय चलन साठा दोन अब्ज डॉलरपेक्षा कमी झाला आहे. तर पाकिस्तानकडे सहा अब्ज डॉलरपेक्षा कमी चलन साठा आहे. त्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली असून २३ डिसेंबर २०२२ अखेर समाप्त आठवडय़ात देशाची परकीय गंगाजळी ५६२.८१ अब्ज डॉलर या समाधानकारक पातळीवर आहे.

Story img Loader