पीटीआय, नवी दिल्ली
सर्वसामान्य आणि धोरणकर्ते दोहोंसाठी डोकेदुखी ठरलेल्या महागाईच्या आघाडीवर किंचित दिलासादायी आकडेवारी गुरुवारी पुढे आली. आधीच्या महिन्यांत ६.२१ टक्क्यांचा चिंताजनक पारा गाठलेला किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांपर्यंत नरमला असून, मुख्यत: भाज्यांच्या किमती घसरल्याचा हा परिणाम आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सरलेल्या नोव्हेंबरमध्ये खाद्यान्न घटकांमधील चलनवाढ ९.०४ टक्क्यांवर उतरली आहे. ऑक्टोबरमध्ये ती १०.८७ टक्के अशा दुहेरी अंकात पोहोचली होती. तर गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२३ मध्ये ती ८.७० टक्के नोंदवली गेली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये भाजीपाला, डाळी आणि त्यासंबंधित उत्पादने, साखर आणि मिठाई, फळे, अंडी, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने, मसाले, वाहतूक आणि दळणवळण आणि वैयक्तिक निगा या क्षेत्रातील महागाईमध्ये लक्षणीय घट दिसून आली, असे सांख्यिकी कार्यालयाने नमूद केले आहे. भाज्यांच्या किमती चढ्याच असल्या तरी वार्षिक तुलनेत त्या ऑक्टोबरमधील ४२ टक्क्यांच्या तुलनेत, नोव्हेंबरमध्ये २९ टक्क्यांपर्यंत ओसरल्या आहेत.

retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
lowest exchange rate of the Indian currency the rupee
रुपयाची घसरगुंडी सुरूच; प्रति डॉलर ८५.८४ चा नवीन तळ
Bombil , Saranga, low visibility , fish price ,
कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ

हेही वाचा : विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर जुलै-ऑगस्टमधील सरासरी ३.६ टक्क्यांपर्यंत नरमलेल्या पातळीवरून, सप्टेंबरमध्ये ५.५ टक्क्यांपर्यंत कडाडला आणि ऑक्टोबरमध्ये तो ६.२ टक्क्यांवर पोहोचला. रिझर्व्ह बँकेच्या उच्च सहनशील पातळीच्या वरच्या टोकालाही भेदणाऱ्या महागाई दरातील या उसळीने रिझर्व्ह बँकेची संभाव्य व्याजदर कपातदेखील लांबणीवर गेली. ऑक्टोबरमधील या भडक्याच्या पार्श्वभूमीवर, गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील महागाई दराचा अंदाज ४.५ टक्क्यांवरून सरासरी ४.८ टक्क्यांपर्यंत वाढविला. विशेषतः खाद्यान्नांच्या किमती कडाडल्यामुळे डिसेंबर तिमाहीसाठी महागाईसंबंधी अनुमानात रिझर्व्ह बँकेने वाढ केली.

फेब्रुवारीत व्याज दरकपातीचे कयास

खरिपातील चांगले उत्पादन आणि जलाशयांतील दमदार पातळी पाहता रब्बीच्या पेरण्या आणि एकंदर हंगामाबाबत दृष्टिकोन सकारात्मक आहे. यातून खाद्यान्न महागाई आटोक्यात येऊन, एकंदर किरकोळ चलनवाढही चौथ्या तिमाहीत ५ टक्क्यांपर्यंत ओसरण्याचा अंदाज आहे. हे घटक फेब्रुवारीत किमान पाव टक्के दरकपातीस निश्चितच अनुकूल आहेत.

रजनी सिन्हा, मुख्य अर्थतज्ज्ञ, केअरएज रेटिंग्ज

हेही वाचा : ‘सतर्क राहून, कुशलतेने आव्हानांचा सामना’, नव्या गव्हर्नरांचे धोरणसातत्यावर भर राखण्याचे प्रतिपादन

ताज्या आकडेवारीत आश्चर्यकारक असे काही नाही. महागाई दर सप्टेंबर ते डिसेंबर आणि नंतरच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत ५.५ टक्क्यांच्या घरात राहण्याचा अंदाज असून, विकासदर मंदावलेला राहील. ही परिस्थिती रिझर्व्ह बँकेची कसरत वाढवणारी असली तरी फेब्रुवारीमध्ये व्याज दरकपातीची शक्यता दिसून येते.

निखिल गुप्ता, मुख्य अर्थतज्ज्ञ, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस

Story img Loader