भारतीय आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत पात्र भागधारकांना प्रति शेअर १८ रुपये या दराने अंतरिम लाभांश जारी केला आहे. २५ ऑक्टोबर २०२३ ही लाभांशाची रेकॉर्ड तारीख असेल, असंही इन्फोसिसने सांगितले. कंपनीच्या लाभांशाच्या घोषणेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत सुमारे १३८ कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
शेअरहोल्डर्स पॅटर्ननुसार, ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या इन्फोसिसमधील मोठ्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. ऋषी सुनक यांच्याकडे इन्फोसिसचे ३,८९,५७,०९६ शेअर्स आहेत. हा हिस्सा कंपनीचा १.०५ टक्के हिस्सा आहे. अशा परिस्थितीत १८ रुपये प्रति शेअर लाभांशावर त्यांची संपत्ती ७० कोटी रुपयांनी वाढली आहे.
हेही वाचाः Forbes Richest Indian Women : सावित्री जिंदाल बनल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला, पाहा टॉप १० यादी
२०२३ मध्ये १३८ कोटींची संपत्ती कशी वाढली?
२०२३च्या पहिल्या तिमाहीत जाहीर झालेल्या निकालांमध्ये प्रति शेअर १७.५० रुपये लाभांश जारी करण्यात आला. २ जून २०२३ रोजी १७.५० रुपयांचा अंतरिम लाभांश जारी केल्यानंतर इन्फोसिसचे शेअर्स एक्स डिव्हिडंडवर व्यवहार करीत होते. या काळात अक्षता मूर्तीच्या संपत्तीत ६८ कोटींची वाढ झाली होती.
हेही वाचाः भारताची आयात आणि निर्यात घटली, सप्टेंबरमध्ये व्यापार तूट १९.३७ अब्ज डॉलरवर
लाभांश ६ नोव्हेंबर रोजी दिला जाणार
त्याचप्रमाणे आता प्रति शेअर १८ रुपये लाभांश जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अक्षता मूर्तींच्या संपत्तीत ७० कोटी रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे, म्हणजेच २०२३ मध्ये ती १३८ कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबर ही लाभांशाची विक्रमी तारीख आहे. शेअरधारकांना माहिती देताना इन्फोसिसने सांगितले की, लाभांश ६ नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे अक्षता मूर्ती ही नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी आहे, ज्यांचे लग्न ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झाले आहे. इन्फोसिसमध्ये मोठा हिस्सा असल्यामुळे कंपनी जेव्हा लाभांश जारी करते, तेव्हा त्यांची संपत्ती अनेक पटीनं वाढते.