महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सन्मान बचतपत्रावर मिळणाऱ्या व्याजावर गुंतवणूकदारांना कर भरावा लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीत मांडलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. विद्यमान आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून सुरू झालेल्या महिला सन्मान बचतपत्रावर प्राप्त होणारे व्याज जरी करपात्र असले तरी त्यावर उद्गम कर अर्थात टीडीएस कापला जाणार नाही, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मंगळवारी परिपत्रक काढून स्पष्ट केले.

४० हजारांपेक्षा कमी व्याजावर टीडीएस लागू होणार नाही

विशेष म्हणजे महिला सन्मान बचतपत्रावर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस लागू होईल. बँकांतील ठेवींवर आर्थिक वर्षात ४० हजार रुपयांपेक्षा जास्त व्याजप्राप्ती असल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम १९४ ए अंतर्गत १० टक्के टीडीएस कापण्याची तरतूद आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत वार्षिक व्याज रकमेची मर्यादा ४० हजारांऐवजी ५० हजार रुपये आहे. त्याउलट महिला सन्मान योजनेतील कमाल २ लाखांच्या गुंतवणुकीच्या मर्यादेवर ७.५ टक्के दराने व्याजानुसार, एका वर्षात १५,००० रुपये आणि दोन वर्षांत (चक्रवाढ लाभ धरून) ३२,००० रुपये परतावा जमा होईल. आर्थिक वर्षात जमा झालेले व्याज ४० हजार रुपयांपेक्षा कमी असल्याने कोणताही टीडीएस लागू होणार नाही, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले. योजनेची दोन वर्षांची परिपक्वता मुदत पूर्ण झाल्यावर संचयित व्याज उत्पन्नावर करदाता, ज्या कर टप्प्यांत (स्लॅब) असेल त्यानुसार कराची आकारणी केली जाईल, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा

हेही वाचाः विश्लेषण: हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड; सरकारने नियम बदलले, पुढे काय?

महिला सन्मान बचतपत्र योजना नेमकी काय?

– योजनेमध्ये कोणाही महिलेला दोन वर्षांच्या कालावधीसाठी खाते उघडता येईल.

– योजनेत किमान गुंतवणुकीची रक्कम १,००० रुपये आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा २ लाख रुपये.- गुंतवणूकदारांना ७.५ टक्के दसादशे व्याज तिमाही आधारावर मिळेल.

– गरजेच्या वेळी खात्यात जमा रकमेच्या ४० टक्के रक्कम काढता येईल.

हेही वाचाः ‘या’ बँका कमी व्याजावर देतात लाखो रुपयांचे वैयक्तिक कर्ज, परतफेड करण्यासही मिळणार बराच अवधी