मुंबईः देशातील आघाडीच्या उद्योगसमूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी प्रदान करणारा, ‘काँग्लोमरेट फंड’ ही या प्रवर्गातील अशा प्रकारची पहिलीच योजना आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने दाखल केली आहे. या योजनेचा प्रारंभिक गुंतवणुकीचा कालावधी (एनएफओ) ५ डिसेंबरपासून सुरू झाला असून, १९ डिसेंबरपर्यंत ही योजना गुंतवणुकीस खुली राहिल.

पिढीजात चालत आलेल्या मजबूत प्रवर्तकांच्या नेतृत्वाखालील समूहातील आणि किमान दोन कंपन्या सूचिबद्ध असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील उद्योगसमूहांच्या समभागांमध्ये या योजनेतून गुंतवणूक केली जाणार आहे, असे आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी ए. बालासुब्रमणियम नवीन फंडाबद्दल माहिती देताना नमूद केले. भारताच्या औद्योगिक क्रांतीला चालना आणि अर्थव्यवस्थेचा कणा ठरलेल्या तसेच चिरकाल टिकलेल्या या उद्योगांच्या वाढीची संभाव्यता तसेच त्यांच्या ठोस कामगिरीशी व गतीशील अर्थव्यवस्थेत संपदा निर्मितीची अनन्यसाधारण संधी म्हणून या योजनेकडे पाहता येईल, असे ते म्हणाले.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Success Story kalyani and dinesh Engineer couple
Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये
only 600 objections and suggestions filed on thane development plan
ठाण्याचा विकास आराखडा निवडणुकांमुळे पडद्याआड? दोन महिन्यांत जेमतेम ६०० हरकती
Bogus applications in fruit crop insurance scheme
फळपीक विमा योजनेतही बोगस अर्जांचा सुळसुळाट; जाणून घ्या, सर्वांधिक बोगस अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आले
pnb housing aims to grow loans by 17 percent in current financial year
आर्थिक वर्षात कर्जात १७ टक्के वाढीचे ‘पीएनबी हाऊसिंग’चे उद्दिष्ट; परवडणाऱ्या घरांसाठी कर्ज वितरण ५,००० कोटींवर नेणार
Ipo market set for record breaking
विद्यमान वर्षात ‘आयपीओं’चा शतकी विक्रम!

हेही वाचा >>>Gold Silver Rate Today : आठवड्याभरात कसे बदलले सोन्या-चांदीचे दर; आज २४ कॅरेटचा रेट काय आहे? इथे करा चेक

विविधीकृत व्यावसाय, नाविन्यता आणि नवतंत्रज्ञान तसेच नवप्रवाहांचा अवलंब, बाजारपेठेत भक्कम स्थिती आणि पैशाचा शाश्वत ओघ निर्माण करण्याची क्षमता अशी वैशिष्ट्ये असलेल्या कंपन्यांच्या समभागांची आदित्य बिर्ला सन लाइफ काँग्लोमरेट फंडासाठी निवड केली जाणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या ३३ टक्के बाजार भांडवलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २२ व्यवसाय विभागांतील १६९ कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी या योजनेतून गुंतवणूकदारांना देऊ करण्यात आली आहे. फंडाने निवडीसाठी ३६ लार्ज-कॅप, ३० मिड-कॅप आणि १०३ स्मॉल-कॅप कंपन्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना विस्तृत वाढीच्या शक्यता आणि वैविध्य पुरविले जाईल.

Story img Loader