पीटीआय, नवी दिल्ली

अदानी समूहाचे प्रवर्तक कुटुंबीय आणि भागीदारांशी संलग्न परदेशी संस्थांद्वारे कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक स्वत:च्याच कंपन्यांच्या समभागांचे भाव फुगवण्यासाठी कथितपणे करण्यात आली, असा आरोप शोधपत्रकारांची जागतिक संघटना असलेल्या ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी)’ ने गुरुवारी केला. अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले, तरी त्याचा परिणामी समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये दणकून विक्री आणि अदानींच्या एकत्रित बाजारमूल्याला तब्बल ३६ हजार कोटींचे नुकसान सोसावे लागले.

A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक
Inflow of Rs 41156 crore into equity funds in December Investment in small midcap funds contributed significantly
डिसेंबरमध्ये ‘इक्विटी फंडा’त ४१,१५६ कोटींचा ओघ; स्मॉल, मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचे मोठे योगदान

जानेवारीमध्ये ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अदानी समूहावर कथित लबाडी आणि गैरप्रकाराचे आरोप केले होते. त्यामुळे समूहातील कंपन्यांच्या बाजारमूल्यास जबर फटका बसला होता. हा घाव ताजा असताना, जवळपास त्याच आरोपांना नव्याने पुष्टी देणारे दस्तावेज ‘ओसीसीआरपी’ने पटलावर आणले आहेत.

आणखी वाचा-चांगली बातमी! आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेने रोजगार निर्मितीचे लक्ष्य केले पार

जगभरात करमुक्त छावण्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मॉरिसशसारख्या देशांतील अनेक दस्तावेज आणि अदानी समूहातील अंतर्गत ई-मेल संदेश आणि फायलींच्या आधारे ‘ओसीसीआरपी’ने हे आरोप केले आहेत. या आरोपांना प्रसिद्धी देणारे वृत्तान्त ‘फायनान्शियल टाइम्स’ आणि ‘गार्डियन’ने गुरुवारी प्रकाशित केले. त्यानुसार, दोन वैयक्तिक गुंतवणूकदार-दुबईचे नासेर अली शाबान अली आणि तैवानचे चांग चुंग-लिंग यांचे अदानी कुटुंबाशी दीर्घकाळ व्यावसायिक संबंध असून, अदानी कुटुंबाने त्यांचा आणि याच प्रकारच्या विदेशस्थ प्रारूपाचा समूहातील कंपन्यांचे समभाग खरेदी आणि विक्रीसाठी आधीपासूनच वापर केला असल्याचे पुढे आले आहे.

या विदेशी संस्थांमार्फत गुप्त व्यवहारांमध्ये गौतम अदानी यांचा मोठा भाऊ विनोद अदानी याने कथितपणे बजावलेल्या प्रभावशाली भूमिकेचेही पुरावेही हाती लागलेले दिसून येतात. मात्र, विनोद अदानी यांची अदानी समूहातील कोणत्या कंपनीच्या दैनंदिन व्यवहारात कोणतीही भूमिका नसल्याचे अदानी समूहाने यापूर्वी वारंवार नमूद केले होते.

आणखी वाचा-LPG सिलिंडरच्या किमतीत १५८ रुपयांची कपात, नवे दर काय?

उपलब्ध दस्तावेजानुसार, विनोद अदानी यांच्याशी निगडित कंपन्यांमध्येही अली आणि चँग हे दोघे सक्रिय होते. त्यांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची खरेदी-विक्री केली. ‘ओसीसीआरपी’ने पुढे आणलेल्या ऑफशोअर आर्थिक नोंदींनुसार, अदानी कुटुंबाच्या सहयोगींनी गौतम अदानी यांना भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली व्यवसायांपैकी एक बनविण्यासाठी स्वत:च्याच कंपन्यांमधील समभाग अनेक वर्षे विकत घेण्याचे व्यवहार केले आहेत. अली आणि चँग या दोघांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने विनोद अदानी यांच्या कंपनीलाही गुंतवणूक सल्ल्यासाठी पैसे दिल्याचे कागदपत्रेही समोर आली आहेत, असे ‘ओसीसीआरपी’ने म्हटले आहे.

या कथित लबाडीच्या गुंतवणूक व्यवहारामुळे २०२२ साली संस्थापक गौतम अदानी हे १२० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते. अदानी समूहाने हिंडेनबर्गचे अहवालातील दाव्यांनाही नाकारले होते. तरी त्याच्या परिणामी समूहातील कंपन्यांच्या एकत्रित बाजार मूल्याला सुरुवातीला १०० अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले होते आणि गौतम अदानी यांना जागतिक श्रीमंतांच्या यादीतील प्रमुख स्थानही गमावेवे लागले होते.

आणखी वाचा-आता PC अन् लॅपटॉप देशातच बनवले जाणार, HP सह ३८ कंपन्यांनी केला अर्ज

‘सेबी’च्या भूमिकेवरही संशय

‘ओसीसीआरपी’ने उघड केलेल्या पत्रानुसार, भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ला २०१४ च्या सुरुवातीला अदानी समूहाच्या कथित संशयास्पद समभाग गुंतवणूक व्यवहारांचे पुरावे देण्यात आले होते. परंतु त्या संबंधाने चौकशी सोडाच, पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येते. आताचे ताजे आरोप आणि त्यांची पुष्ठी करणारे दस्तऐवज जर खरे असतील, तर याचा अर्थ सार्वजनिकरित्या सूचीबद्ध समभागांसाठी भारतीय भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने घालून दिलेल्या नियमांचे ते थेट उल्लंघन होईल. परिणामी ‘सेबी’ला अदानी समूहासंबंधाने सुरू असलेला तपास आणखी खोलवर जाऊन करणे क्रमप्राप्त ठरेल.

जुन्याच आरोपांना नव्याने मांडणी – अदानी समूह

यावर अदानी समूहाने दिलेल्या खुलासेवार निवेदनात सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘जुनेच आरोप पुन्हा वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत. परदेशी माध्यमांच्या एका विभागाद्वारे समर्थित, सोरोस-फंडाच्या हितसंबंधांतून पुढे आलेल्या या गटाने हिंडेनबर्ग अहवालातील मुर्खपणालाच पुनरुज्जीवित करण्याचा हा प्रयत्न आहे,’ असा या निवेदनाने दावा केला आहे. ‘ताज्या आरोपातील दावे हे एका दशकापूर्वी बंद झालेल्या प्रकरणांवर आधारित आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ओव्हर इनव्हॉइसिंग, परदेशात पैसे हस्तांतरित करणे, संबंधित पक्षांकडून व्यवहार आणि विदेशी संस्थांद्वारे गुंतवणूक केल्याच्या त्या आरोपांची चौकशी पूर्ण केली आहे,’ असे निवेदनात म्हटले आहे. तथापि कोणतेही अवाजवी मूल्यांकन नसल्याचा आणि सर्व व्यवहार कायदेसंमतच होते, या त्या चौकशीच्या निष्कर्षाची स्वतंत्र न्यायिक प्राधिकरण आणि अपीलीय न्यायाधिकरण या दोघांनीही पुष्टी केली होती. निवेदनानुसार, ‘भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२३ मध्ये या प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने दिला आहे. निधी हस्तांतरित करण्यासंबंधीचे आरोप तथ्यहीन असल्याचे किंवा त्याला कोणताही आधार नसल्याचा निर्वाळा दिला आहे.’

नेमके आरोप काय?

  • मॉरिशसस्थित कंपन्यांतून अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक
  • अदानी समूहातील निगडित नासीर अली शबान अली, चँग चुंग-लिंग यांचा संबंध
  • अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांती परदेशी कंपन्यांमार्फत खरेदी-विक्री
  • स्वतःच्या कंपन्यांच्या समभाग खरेदीतून त्यांनी भाव कृत्रिमरित्या फुगवले
  • गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांच्या कंपनीकडून दोघांना गुंतवणूक सल्ला

Story img Loader