मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीबाबत आस्तेकदम भूमिकेने जागतिक बाजारात सलग दुसऱ्या सत्रात विक्रीची लाट निर्माण केली. त्या परिणामी सलग पाचव्या सत्रात सुरू राहिलेल्या घसरणीच्या मालिकेत, शुक्रवारी सेन्सेक्सने आणखी १,१०० हून अधिक अंश गमावले, तर निफ्टी २३,५०० पातळीपर्यंत रोडावला. गुंतवणूकदारांना सलग पाच सत्रांत तब्बल साडेअठरा लाख कोटींचे नुकसान सोसावे लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सप्ताहअखेरच्या सत्रात मुंबई शेअर निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,१७६.४६ अंशांची म्हणजेच १.४९ टक्क्यांची घसरण झाली आणि तो ७८,०४१.५९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने १,३४३.४६ अंश गमावत ७७,८७४.५९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३६४.२० अंशांनी घसरून २३,५८७.५० पातळीवर पोहोचला आहे. या निरंतर घसरणीने डिसेंबरच्या सुरुवातीला साधलेली वाढ पूर्णपणे धुऊन निघाली असून, दोन्ही निर्देशांकांनी महिनाभरापूर्वीचा तळ पुन्हा गाठला आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थाही पुन्हा विक्रेत्याच्या भूमिकेत गेल्याने घसरगुंडीची व्याप्ती वाढली आहे.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टेक महिंद्र, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अल्ट्राटेक सिमेंट आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांना सर्वाधिक झळ पोहोचली. तर जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले आणि टायटनचे समभाग वधारले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात ४,२२४.९२ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
हेही वाचा >>>Sensex वर येईना, गुंतवणूकदारांची पुन्हा दैना; सलग पाचव्या सत्रात घसरण, निफ्टीचीही हाराकिरी!
फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षेपेक्षा कमी दर कपातीच्या संकेताचा जगभरातील भांडवली बाजारांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. स्थानिक बाजारात निराशेचे वातावरण असून, पुन्हा मंदीवाल्यांनी पकड मजबूत केली आहे. ज्याचा जास्त मूल्यांकन असलेल्या समभागांना सर्वाधिक फटका बसत आहे.- विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस.
सप्ताहाभरात निर्देशांकांना ५ टक्क्यांची गळती
सलग पाच सत्रांत घसरणीच्या मालिकेने बाजारासाठी हा मागील दोन वर्षांतील सर्वात वाईट आठवडा ठरला. पाच सत्रांमध्ये एकत्रित मिळून सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी जवळपास ५ टक्क्यांचे नुकसान सोसले आहे. ४,०९१.५३ अंश अर्थात ४.९८ टक्क्यांनी गडगडलेला सेन्सेक्स, तर पाचपैकी तीन सत्रांत १,००० अंशांहून अधिक आपटला आहे. परिणामी, या सप्ताहाभरात गुंतवणूकदारांच्या मत्तेला तब्बल १८.४३ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
सेन्सेक्स ७८,०४१.५९ -१,१७६.४६ -१.४९%
निफ्टी २३,५८७.५० -३६४.२० -१.५२%
डॉलर ८५.०३ -१० पैसे
तेल ७२.१८ -०.९६%