Donald Trump iPhone: अ‍ॅपलने अलीकडेच त्यांच्या आयफोन युजर्ससाठी एआय फीचर्स लाँच केले आहेत. पण, यानंतर कंपनीला एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागले. अलिकडेच काही युजर्सनी एक्सवर पोस्ट केले आहे की, “आयफोनमधील व्हॉइस-टू-टेक्स्ट फीचरमध्ये जेव्हा कोणी ‘वंशवादी’ म्हणतो तेव्हा तिथे ‘ट्रम्प’ असे टाइप होऊन येते. हे फक्त काही सेकंदांसाठी घडते, परंतु त्यानंतर योग्य शब्द दिसू लागतो. व्हायरल झालेल्या टिकटॉक व्हिडिओनंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅपलचे आश्वासन

हा प्रकार समोर आल्यानंत अ‍ॅपल कंपनीने नुकतेच असोसिएटेड प्रेसला एक निवेदन दिले आहे. या निवेदनात अ‍ॅपलने म्हटले आहे की, “डिक्टेशनला एक्टिव्ह करणाऱ्या स्पीच रेकग्निशन मॉडेलमधील समस्येची आम्हाला माहिती मिळाली आहे आणि आम्ही आता त्यावर उपाय शोधत आहोत.”

दरम्यान, आयफोनमधील या बगमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु अ‍ॅपलने नमूद केले की, ते दोन शब्दांमधील “ध्वन्यात्मक ओव्हरलॅप” (Phonetic overlap) मुळे असे घडत असेल. याचबरोबर कंपनीने हा बग लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

अ‍ॅपलच्या सिरी टीमचे माजी सदस्य आणि एआय तज्ज्ञ जॉन बर्की यांना शंका आहे की ही केवळ तांत्रिक चूक नसावी. ते म्हणाले की, “कोणीतरी तरी हा खोडसाळपणा केल्यासारखे वाटत आहे. यामध्ये मोठा प्रश्न असा आहे की, ही फेरफार डेटामध्ये करण्यात आली होती की कोडमध्ये काही बदल करण्यात आला होता?”

ट्रम्प आणि अ‍ॅपल बगचा संबंध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अ‍ॅपल बगचा संबंध येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात, अ‍ॅपलच्या व्हॉइस असिस्टंट सिरीने “डोनाल्ड ट्रम्प कोण आहे?” असे विचारल्यानंतर लिंगाचे छायाचित्र दिसायची, यानंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती.

काही युजर्सनी त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विकिपीडिया पेजवर चुकीची छायाचित्रे अपलोड केली होती. त्यामुळे ही समस्या उद्भवली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर सिरीने ती माहिती काढून टाकल्याचे वृत्त qz.com ने दिले होते.

अ‍ॅपलकडून २० रोजगार निर्मितीची योजना

या आठवड्याच्या सुरुवातीला, अ‍ॅपल कंपनीने पुढील चार वर्षांत अमेरिकेत ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची आणि याचबरोबर २० हजार रोजगार निर्मितीची योजना जाहीर केली आहे.