मुंबई : विद्यमान २०२४ मध्ये मुख्य बाजार मंचावर समभाग सूचिबद्धतेसाठी आतापर्यंत ७५ कंपन्यांनी प्राथमिक बाजारातून निधी उभारणी केली आहे. नियामक ‘सेबी’ने नुकतीच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात एनएसडीएल, मोबिक्विक, बेलस्टार मायक्रोफायनान्ससह २९ कंपन्यांना प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) हिरवा कंदील दिला आहे, हे पाहता ‘आयपीओं’चे या वर्षांत विक्रमी शतक साजरे होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> सर्वाधिक जीएसटी महसूल १८ टक्के करटप्प्यातून

प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून २०२४ मध्ये ७५ कंपन्यांनी १.२२ लाख कोटींची निधी उभारणी केली. यातून २०२१ मधील १.१८ लाख कोटी रुपयांच्या निधी उभारणीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. ॲक्सिस कॅपिटलच्या अहवालानुसार, सुमारे २९ कंपन्यांनी त्यांच्या आगामी समभाग विक्रीसाठी ‘सेबी’ची मान्यता मिळविल्याने ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. यापैकी एनएसडीएलला ३० सप्टेंबरला आयपीओसाठी ‘सेबी’कडून हिरवा कंदील मिळाला, जी संपूर्णपणे आंशिक समभाग विक्री अर्थात ओएफएसच्या माध्यमातून ५.७२ कोटी समभागांची विक्री करणार आहे. त्याबरोबरच वन मोबिक्विक सिस्टीम्सने १९ सप्टेंबरला ७०० कोटी रुपयांच्या निधी उभारणीसाठी सेबीची मंजुरी मिळवली.

हेही वाचा >>> उत्पादन क्षेत्राची वाढ ११ महिन्यांच्या नीचांकी; किंमतवाढीच्या दबावाने घटलेल्या कार्यादेशांचा फटका

अगदी अलीकडे, इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) ला २९ नोव्हेंबरला, तिच्या ४,००० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी मंजुरी देण्यात आली. युनिमेक एरोस्पेस ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंगने २१ नोव्हेंबरला ५०० कोटींच्या निधी उभारणीसाठी मंजुरी मिळवली आहे. बेलस्टार मायक्रोफायनान्सचा आयपीओदेखील सेबीने मंजूर केला आहे, ज्याने १,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीचे उद्दिष्ट राखले आहे.