20 Thousand Crore Unclaimed Insurance Amount : आयुर्विमा (लाइफ इन्शुरन्स) क्षेत्रातीत एकूण २०,०६२ कोटी रुपयांच्या रकमेचे कोणीही दावेदार नसल्याचे समोर आले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, ही आकडेवारी मार्च २०२४ पर्यंतची आहे.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) ने म्हटले आहे की, “२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आयुर्विमा कंपन्यांकडे कोणीही दावा न केलेली २२,२३७ कोटी रुपये इतकी रक्कम होती. दावा न केलेल्या रकमेचे दावेदार शोधण्यासाठी आणि ती त्यांना परत करण्यासाठी, जून २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत एक विशेष मोहीम राबवली होती.”

stock market investment tips for Indians
बाजार रंग : बाजारासाठी अडथळ्यांची शर्यत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव
loksatta readers feedback
लोकमानस: पिढ्या बरबाद करणारे धोरण
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
CRR, CRR reduction, CRR latest news,
ससा कासवाची गोष्ट, ‘सीआरआर’ कपात लाभदायी?
Disruption, entrepreneur, startup ,
 Disruption- मन्वंतर: प्रतिशब्द : अशाश्वती मूर्तिमंत दिसू लागली! 
Prashant Kishor Arrested BPSC Protest
Prashant Kishor Arrested : बेमुदत उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अटक, पाटणा पोलिसांची कारवाई, नेमकं काय घडलं?

या विशेष मोहिमेच्या काळात आयुर्विमा कंपन्यांकडे असलेल्या एकूण रकमेतील सुमारे एक हजार कोटी रुपयांचे दावेदार शोधण्यात यश आले होते.

मास्टर सर्कुलरमध्ये बदल

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने फेब्रुवारी २०२४ मध्ये दावा न न केलेल्या रकमेचे योग्य दावेदार शोधण्यासाठी आणि ती रक्कम त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी ‘दावा न केलेल्या रकमेवरील मास्टर सर्कुलर’ मध्ये सुधारणा देखील केली होती. याद्वारे काही व्याख्यांमध्ये बदल करण्यात आला होता. याचबरोबर विमा कंपन्यांना सध्याच्या दावा न केलेल्या रकमा कमी करण्यासाठी आणि या रकमेमध्ये आणखी वाढ होऊ नये यासाठी काही उपायही सुचवले आहेत.

हे ही वाचा : RTGS, NEFT Transactions : आता चुकूनही जाणार नाहीत चुकीच्या खात्यात पैसे, NEFT आणि RTGS वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयचे मोठे पाऊल

आयुर्विमा क्षेत्रातील कंपन्यांनी २०२३-२४ मध्ये एकूण ५.७७ लाख कोटींचा लाभ ग्राहकांना दिला आहे. जो निव्वळ प्रीमियमच्या ७०.२२ टक्के इतका आहे. २०२४ मध्ये सरेंडर/विड्रॉवल खात्यावर दिलेले लाभ १५.२९ टक्क्यांनी वाढून २.२९ लाख कोटी रुपये इतके झाले. ज्यात सार्वजनिक क्षेत्रातील आयुर्विमा कंपनीचा वाटा ५८.३६ टक्के इतका होता.

हे ही वाचा : शेअर बाजारातील कंपन्यांकडे आहे भरपूर पैसा, अव्वल ५०० कंपन्यांच्या ताळेबंदात ७.६८ लाख कोटींची रोकड

IRDAI कडून उपाय

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने दावा न केलेली रक्कम कमी करण्यासाठी अनेक उपायांची अंमलबजावणीही केली आहे. यामध्ये विमा कंपन्यांनी पॉलिसीधारकांना त्यांचे संपर्क तपशील अद्ययावत करण्यास सांगणे, केवायसी तपशील नियमितपणे अद्यावत करणे, ग्राहकांचा शोध घेण्यासाठी क्रेडिट ब्युरो आणि एग्रीगेटर्सशी भागिदारी करणे आणि जाहिरात करणे यासारख्या उपायांचा समावेश आहे.

Story img Loader